मुंबईकरांना मोठा दिलासा...'या' उपनगरातून कोरोना हद्दपार! 24 तासांत एकही नवा रुग्ण नाही

कोरोनाच्या (Coronavirus) विळख्यात सापडलेली देशाची आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबईची (Mumbai) आता हळूहळू सुटका होताना दिसत आहे.

कोरोनाच्या (Coronavirus) विळख्यात सापडलेली देशाची आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबईची (Mumbai) आता हळूहळू सुटका होताना दिसत आहे.

  • Share this:
    मुंबई, 25 डिसेंबर: कोरोनाच्या (Coronavirus) विळख्यात सापडलेली देशाची आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबईची (Mumbai) आता हळूहळू सुटका होताना दिसत आहे. मुंबईतील सर्वात मोठं उपनगर असलेलं दादर शनिवारी कोरोनामुक्त झालं. गेल्या 24 तासांत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याची माहिती मिळाली आहे. ही बाब मुंबईकरांसाठी दिलासादायक आहे. गेल्या 30 एप्रिलनंतर असं पहिल्यांदाच घडलं आहे. दादरमध्ये 30 एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर मात्र कोरोनाचा विस्फोट झाला होता. दादरमध्ये कोरोना रुग्णाचां आकडा 4500 च्यावर गेला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. काल दादरमध्ये 8 कोरोनाबाधित नव्या रुग्णांची भर पडली होती. मात्र, आज एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. हेही वाचा...इंग्रजी बोलून ड्रग्जच्या जाळ्यात ओढणारी 12 वी पास आफिन; सोशल मीडियावर लाखो फॅन्स दादरमध्ये एकूण 4750 कोरोना रुग्ण सापडले होते. त्यापैकी 4475 रुग्ण बरे झाले असून 102 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर धारावीमध्ये काल एकही नवा रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, आज एका रुग्णांची भर पडली आहे. धारावीमध्ये 3789 कोरोनाबाधितांची एकूण संख्या आहे. त्यापैकी 3464 रुग बरे झाले असून 13 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर माहिममध्ये आज 7 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. काल माहिमध्ये माहिममध्ये 6 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. माहिमध्ये एकूण 4568 कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 4215 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 209 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आशिया खंडातील सर्वात मोठा स्लम एरिया समजला जाणारा धारावी परिसरातून कोरोनाचा समूळ नायनाट झाल्याचं म्हटलं जात आहे. धारावीत कोरोनाचा  प्रादुर्भाव कमी झाला आहे. काल एकही नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली नव्हती. हेही वाचा...आधी चार वेळा चौकशी झाली, ही पाचवी; आणखी काय म्हणाले एकनाथ खडसे धारावी परिसरात शुक्रवारी कोरोनाचा एकही पॉजिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता. गेल्या एप्रिलनंतर असं पहिल्यांदाच घडलं आहे. 2.5 वर्गकिलोमीटर परिसरात वसलेल्या धारावीमध्ये 6.5 लाखांहून अधिक लोक वास्तव्य करतात. धारावीत एप्रिल महिन्यात पहिल्यांदा आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले होते. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ झाली होती. एकट्या धारावीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 3788 वर पोहोचली होती. सध्या धारावीत 10 पेक्षाही कमी कोरोनाबाधित रुग्णसंख्या आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published: