Home /News /news /

संपूर्ण देश प्रदूषणाने वेढला, झारखंड सर्वाधिक प्रदूषित...महाराष्ट्र कितव्या नंबरवर?

संपूर्ण देश प्रदूषणाने वेढला, झारखंड सर्वाधिक प्रदूषित...महाराष्ट्र कितव्या नंबरवर?

देशातील प्रदूषणाचा अहवाल ग्रीनपीस इंडियानं सादर केला आहे. या अहवालातून झारखंडमधील झारिया हे शहर सर्वात प्रदूषित आहे. तर दिल्ली देशातील 10 वं प्रदूषित शहर आहे.

    नवी दिल्ली, 22 जानेवारी:  दिवसेंदिवस देशातील प्रदूषणात मोठी वाढ होताना दिसतेय. त्यामुळं अनेक शहरातील वातावरण अतिशय खराब झालं आहे. हवेच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होते. त्यामुळं अनेक शहरं राहण्यासाठी योग्य नसल्याचं सांगण्यात येतंय.  त्यातच यंदाचा ग्रीनपीस इंडियानं पर्यावरणाचा अहवाल सादर केला आहे. या अहवालातून धक्कादायक वास्तव पुन्हा समोर आलं आहे. देशातील अनेक शहरातील वातावरणाच्या पातळीत मोठी घसरण झाली आहे. देशातील 287 शहरातील वातारणाचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आला आहे. यात 287 पैकी 231 शहरातील वातावरणाची पातळी पीएम 10, 60 मायक्रोग्राम असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यामुळं सर्वचं शहरांसाठी धोक्याचा इशारा या अहवालातून समोर आला आहे. कोणतं शहर आहे सर्वात प्रदूषित? ग्रीनपीस इंडियाच्या पर्यावरणविषयक हवालातून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. देशातील सर्वच महत्त्वाच्या शहरातील वातावरणाची पातळी कमी होत असल्याचं अहवालातून सांगण्यात आलं आहे.  त्यामुळं दिवसेंदिवस शहर प्रदूषणाच्या विळख्यात जात आहेत. यंदाच्या प्रदूषणाच्या अहवालानुसार झारखंड राज्यातील झरिया हे शहर देशात सर्वात प्रदूषित आहे. झारखंडमधील कोळसा खाणींमुळं तिथलं वातावरण सर्वाधिक प्रदूषित आहे. झारिया शहरातील पीएम 10 पेक्षा कितीतर जास्त असल्याचं समोर आलं आहे. 2018 सालच्या अहवालानुसारन झारिया शहराचं वातावरण 322 मायक्रोग्राम प्रती घनमीटर आहे. जे सरासरी वातावरणाच्या 6 टक्के अधिक आहे. 0-60 टक्के मायक्रोग्राम वातावरण सुरक्षित असल्याचं मानलं जातं. धनबाद शहर प्रदूषणात दुसऱ्या स्थानी झारखंड राज्यातीलच धनबाद शहर प्रदूषणात दुसऱ्या स्थानी आहे. धनबाद शहरात कोळशाच्या अनेक खाणी आहेत. हे शहर कोळशाच्या उद्योगासाठी ओळखलं जातं. कोळश्यामुळं शहरातील वातावरण मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालं आहे. त्यामुळं प्रदूषणाच्या यादीत धनबाद शहर देशात दुसऱ्या स्थानी आहे. दिल्ली प्रदूषणात 10 व्या स्थानी देशातील सर्वच शहरातील वातावरणाची पातळी घसरत असल्याचं ग्रीनपीस इंडियाच्या हवालातून समोर आलं आहे. दिल्लीतील वातावरणाची पातळीही प्रचंड घसरली आहे. त्यामुळं प्रदूषणाच्या यादीत दिल्लीचं स्थान दहावं आहे.  त्यामुळं पर्यावरण रक्षणासाठी सर्वच शहरांनी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. लुंगलेई शहर देशात सर्वात कमी प्रदूषित देशभरातील 287 शहरातील पीएम 10 टाडाचं विश्लेषण करून हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार दिल्लीच्या प्रदूषणात घट झाली आहे. 2017 साली दिल्लीच्या प्रदूषणाचा स्तर 240 मायक्रोग्राम प्रति घन मीटर होतं. 2018 साली प्रदूषणाचा स्तर कमी होऊन ते 225 झाला आहे. या रिपोर्टनुसार मिझोरम राज्यातील लुंगलेई हे शहर देशातील सर्वात कमी प्रदूषित आहे. या शहराचं वातावरण सर्वात कमी आहे. त्यानंतर मेघालय राज्यातील डौकी शहर सर्वात कमी प्रदूषित आहे. 10 प्रदूषित शहरांपैकी 6 उत्तर प्रदेशातील देशातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी उत्तर प्रदेशातील 6 शहरं आहे. उत्तर प्रदेशातील शहरं सर्वाधिक प्रदूषित असल्याचं ग्रीनपीस इंडियाच्या अहवालातून समोर आलं आहे. सर्वाधिक प्रदूषित शहरात नोएडा, गाझियाबाद, बरेली, अलहाबाद, मुरादाबाद, आणि फिरोजाबाद शहर आहे. महाराष्ट्र 21 व्या स्थानी ग्रीनपीस इंडियाच्या अहवालात महाराष्ट्रातील अनेक शहरांचं प्रदूषण वाढत असल्याचं सांगण्यात आलं आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रातील अनेक शहरातील वातावरण प्रदूषित होतंय. प्रदूषणात महाराष्ट्राचा 21 क्रमांक लागतोय. महाराष्ट्रातील प्रदूषणाचं प्रमाणही कमी करण्याची गरज आहे. हेही वाचा - सावधान! फुटपाथवर विकणाऱ्या चहा-कॉफीमध्ये मिसळला जातोय गांजा मोदी सरकारला मोठा दिलासा; CAA, NRC ला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या