• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • ‘आता 10 कोटी पार करू’; झरिन खानच्या पोस्टवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

‘आता 10 कोटी पार करू’; झरिन खानच्या पोस्टवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

झरिन खानने रचला नवा विक्रम; सोशल मीडियावर होतोय शुभेच्चांचा वर्षाव

 • Share this:
  मुंबई 25 जुलै: वीर या चित्रपटातून नवारूपास आलेली झरिन खान (Zareen Khan) बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. झरिन चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (Zareen Khan social media post) बोल्ड फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती सतत चर्चेत असते. परिणामी तिच्या ऑनलाईन फॅन फॉलोइंगमध्ये दिवसेंदिवस कमालिची वाढ होत चालली आहे. (Zareen Khan 10 million followers) अलिकडेच तिने ऑनलाईन फॉलोअर्समध्ये तब्बल एक कोटीचा पल्ला गाठला. Pornography Case: राज कुंद्राच्या संकटात वाढ; पोलिसांच्या हाती लागली गुप्त तिजोरी झरिनने ही आनंदाची बातमी एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. “आज आपलं कुटुंब 10 दशलक्ष अर्थात 1 कोटींच्याही पलिकडे गेलं आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे मनापासून आभार. तुमच्यामुळेच आपलं कुटुंब दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.” अशी पोस्ट करत झरिनने आपला आनंद व्यक्त केला. तिच्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चाहत्यांनी आता 10 कोटींचा पल्ला गाठूया असं म्हणत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘कौतुक करतात पण काम देत नाही’; कश्मीरा करतेय बॉलिवूड सोडण्याचा विचार
  View this post on Instagram

  A post shared by Zareen Khan (@zareenkhan)

  काही दिवसांपूर्वी झरीन खान एका अपघातामुळे चर्चेत आली होती. गोव्यात तिच्या गाडीचा अपघात झाल्यामुळे त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यावेळी अभिनेत्री झरीन खानची गाडी असल्यामुळे हे प्रकरण बरच चर्चेत आलं होतं.
  Published by:Mandar Gurav
  First published: