'दंगल'स्टार झायराला निघायचंय डिप्रेशनमधून बाहेर

दंगल' चित्रपटात आपल्या प्रतिस्पर्ध्याला धूळ चारणारी अभिनेत्री झायरा वसीम खऱ्या आयुष्यात नैराश्याशी दंगल करते आहे. या परिस्थितीतून आपल्याला बाहेर निघायचं आहे असं तीनं सोशल मीडियावर जाहीर केलंय.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: May 11, 2018 07:49 PM IST

'दंगल'स्टार झायराला निघायचंय डिप्रेशनमधून बाहेर

मुंबई,ता.11,मे: 'दंगल' चित्रपटात आपल्या प्रतिस्पर्ध्याला धूळ चारणारी अभिनेत्री झायरा वसीम खऱ्या आयुष्यात नैराश्याशी दंगल करते आहे. आपण गेल्या चार वर्षांपासून नैराश्यग्रस्त अवस्थेचा सामना करत असल्याचं तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलंय. आपण मानसिक आजारपणाचा खुलेपणाने स्वीकार करायचा ठरवलंय. याचा नेटानं सामना करायचा असा निश्चय मी केलाय.

 काय म्हणतेय झायरा...

झायराची नैराश्याशी 'दंगल'

मी नैराश्यात आहे ही गोष्ट मान्य करायला आजवर काचरत होते. कारण 'डिप्रेशन'कडे आपल्या समाजात प्रचंड नकारात्मक दृष्टीनं पाहिलं जातं आणि या नकारात्मकतेमुळे मला ही गोष्ट मान्य करण्याचीही भीती वाटायची. दुसरे म्हणजे नैराश्य वगैरे येण्यासाठी तू फारच तरुण आहेस किंवा हे ही दिवस जातील… हा आयुष्याचा एक टप्पा आहे, असं मला वारंवार सांगण्यात आलं.

परंतु नैराश्याचे हे दिवस संपत मात्र नव्हते. दिवसाला ५ गोळ्या घेणे, रात्री - अपरात्री रुग्णालयात दाखल करावे लागणे, विचित्र भास होणे, पराकोटीचा एकटेपणा जाणवणे, आठवडा - आठवडा रात्री झोपच न लागणे, दिवसेंदिवस उपाशी राहणे हा सगळा त्रास मी गेली ४ वर्ष सहन करते आहे.

Loading...

अनेकदा आयुष्य संपवण्याचा विचारही माझ्या मनात आला. पण मी आता नेटानं लढणार आहे. हे सगळं करण्यासाठी मला तुमच्या प्रार्थनेची आणि आशीर्वादाची गरज आहे' असंही तिनं लिहिलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2018 07:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...