मुंबई विद्यापीठाचे निकाल आता 15 ऑगस्टपर्यंत लागणार ?

मुंबई विद्यापीठाचे निकाल आता 15 ऑगस्टपर्यंत लागणार ?

मुंबई विद्यापीठाचे निकाल आता थेट १५ ऑगस्ट पर्यंत लागण्याची शक्यता आहे. तशी माहीतीच कुलगुरू संजय देशमुख यांनी युवासेनेच्या पदाधिकार्यांना दिलीय.

  • Share this:

मुंबई 1 ऑगस्ट, प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाचे निकाल आता थेट १५ ऑगस्टपर्यंत लागण्याची शक्यता आहे. तशी माहीतीच कुलगुरू संजय देशमुख यांनी युवासेनेच्या पदाधिकार्यांना दिलीय. मुंबई विद्यापीठावर आज युवासेनेनं धडक मोर्चा काढला होता. या मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू संजय देशमुख आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळी कुलगुरू संजय देशमुख यांनीही निकालाच्या दिरंगाईसंबंधीची हतबलता बोलून दाखवल्याचा दावा युवा सेनेच्यावतीनं करण्यात आलाय.

दरम्यान, काल कुलसचिव एम. ए. पठाण यांनी कसल्याही परिस्थितीत 5 ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे निकाल लागतील असा दावा केला होता. अशातच स्वतः कुलगुरूंनीच आंदोलक विद्यार्थ्यांना 15 ऑगस्टपर्यंत निकाल लागणार नसल्याचं सांगितल्याने विद्यार्थ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागलाय. म्हणूनच मुंबई विद्यापीठाने निकालाची निश्चित तारीख जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2017 03:08 PM IST

ताज्या बातम्या