मुंबई, 21 फेब्रुवारी : यवतमाळमध्ये शिक्षणासाठी आलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांना युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. त्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना विचारलं असता त्यावर चौकशी करून कारवाई करू असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी युती संदर्भातही त्यांना प्रश्न केला असता झालेली युती भक्कम असल्याचं आदित्य म्हणाले.