मुंबई, ०८ मार्च- वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या 'उरी- द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमातून देशभक्तीची भावना जागवणाऱ्या रोनी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपीने आता जागतीक पातळीवर प्रसिद्ध अॅक्शन विनोदीपट मर्द को दर्द नहीं होताचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दासानी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
#MardKoDardNahiHota, trailer out today!@Abhimannyu_D @radhikamadan01 @Vasan_Bala @JimitTrivedi06 @gulshandevaiah @manjrekarmahesh @ZeeMusicCompany @RSVPMovies pic.twitter.com/pgO5SdXjS5
— Ronnie Screwvala (@RonnieScrewvala) March 8, 2019
या सिनेमातील हिरोला कोणतीही दुखापत झाल्यावर दुखत नसतं. दुखणं काय असतं हेच मुळात त्याला माहीत नसतं. ट्रेलरमध्ये पॉवर पॅक अॅक्शन आणि हसवायला लावणारे विनोद पाहायला मिळतील. ट्रेलरमध्ये नायक, नायिका आणि खलनायक दाखवण्यात आले आहेत. तसेच उरी सिनेमाचं कनेक्शनही यात दाखवण्यात आलं आहे. निर्मात्यांनी वेगळ्या पद्धतीने हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, ‘मर्द को दर्द नहीं होता पर प्यास तो लगती है ना! इट्स टाइम टू गो क्रेजी एंड वाइल्ड, ट्रेलर आउट.’
मामी फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाला स्टॅडिंग ओवेशन मिळालं होतं. अतिशय दुर्दम्य आजाराने पीडित मुलाची असामान्य कथा सांगण्यात आली आहे. अभिमन्यु दासानी आणि राधिका मदान यांनी या सिनेमात मार्शल आर्टसोबत अनेक अॅक्शन स्टंट करताना दिसणार आहेत. तर गुलशन देवैया या सिनेमात खलनायक आणि मार्शल आर्ट तज्ज्ञाची भूमिका साकारताना दिसणार आहे. येत्या २१ मार्चला हा सिनेमाला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
VIDEO : अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा आणि सुप्रिया सुळे...कसं आहे नणंद-भावजयमधील बाँडिंग?