हा VIDEO पाहून हृदयाचा ठोका चुकेल, साखरपुडा मोडल्याने तरुणाने इमारतीवरून मारली उडी!

हा VIDEO पाहून हृदयाचा ठोका चुकेल, साखरपुडा मोडल्याने तरुणाने इमारतीवरून मारली उडी!

प्रेमाचा भंग झाल्यामुळे तरुण निराश झाला होता. तो रागाच्या भरात 3 मजली इमारतीवर गेला. त्याला खाली उतरवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण त्याने कोणाचंही ऐकलं नाही.

  • Share this:

बनासकांठा (गुजरात)09 सप्टेंबर : हल्ली प्रेमासाठी लोक काहीही करतात. अगदी प्रेमात जीव दिल्याच्याही अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साखरपुडा तुटल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने 3 मजली इमारतीवरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आत्महत्येचा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे.

एका तरुणाचा त्याच्याच गावातील एका मुलीशी साखरपुडा ठरला हेता. पण काही कारणांमुळे साखरपुडा तुटला. हे तरुणाला सहन झालं नाही आणि त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. प्रेमाचा भंग झाल्यामुळे तरुण निराश झाला होता. तो रागाच्या भरात 3 मजली इमारतीवर गेला. त्याला खाली उतरवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण त्याने कोणाचंही ऐकलं नाही.

इतर बातम्या - क्षणात तुटली साता जन्माची गाठ, पतीला उचलण्यासाठी हात देताच डंपरनं चिरडलं!

अखेर गावातील नागरिकांनी जाळी आणली. त्यानंतर पोलिसांना प्राचारण करण्यात आलं. पण तरुणाने कोणाचंही ऐकलं नाही आणि इमारतीवरून उडी मारली. लोकांनी खाली जाळी धरल्यामुळे यातून तो थोडक्याच बचावला आहे. त्याने उडी घेताच त्याला तात्काळ नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

तरुणाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर योग्य उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

VIDEO : आदर्श! 4 सुनांनी दिला सासूच्या पार्थिवाला खांदा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2019 09:53 PM IST

ताज्या बातम्या