मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अक्कलकोटचा 'देवमाणूस', जिंकलंस भावा! दोन मुलांसह विहिरीत उडी घेतलेल्या महिलेचा 'असा' वाचवला जीव

अक्कलकोटचा 'देवमाणूस', जिंकलंस भावा! दोन मुलांसह विहिरीत उडी घेतलेल्या महिलेचा 'असा' वाचवला जीव

महिलेने तिच्या दोन्ही लहान मुलांना विहिरीत टाकलं आणि स्वत: देखील उडी मारली. पण एक देवमाणूस तिथे आला. त्याने जीवाची पर्वा न करता तिघांना वाचवलं.

महिलेने तिच्या दोन्ही लहान मुलांना विहिरीत टाकलं आणि स्वत: देखील उडी मारली. पण एक देवमाणूस तिथे आला. त्याने जीवाची पर्वा न करता तिघांना वाचवलं.

महिलेने तिच्या दोन्ही लहान मुलांना विहिरीत टाकलं आणि स्वत: देखील उडी मारली. पण एक देवमाणूस तिथे आला. त्याने जीवाची पर्वा न करता तिघांना वाचवलं.

  • Published by:  Chetan Patil
प्रितम पंडित, सोलापूर, 19 ऑगस्ट : आपल्या आयुष्यात काहीही अडचणी असतील किंवा त्रास असेल, या अडचणींवर आत्महत्या हा पर्याय अजिबात असू शकत नाही. आत्महत्या करणं म्हणजे आपण अडचणीच्या काळात आपल्याला लढाई करण्याची जी संधी मिळालीय ती संधी अशीच सोडून देणं. एखाद्या त्रासावर आत्महत्या हा पर्यायच असू शकत नाही. आपण लढणं आणि त्यातून संबंधित अडचणीवर मात करणं यालाच खरा सिकंदर संबोधलं जातं. मॅसिडॉनचा राजा सिकंदर हा त्याच्या आयुष्यात कधीच कोणती लढाई हारला नाही. तो खूप लढला, मोठमोठ्या मोहिम्या केल्या आणि तो जिंकला. त्यामुळेच या सिकंदरचं जगभरात नाव आहे. हे सगळं सांगण्यामागील कारण म्हणजे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात घडलेली एक घटना. एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महिलेने तिच्या दोन्ही लहान मुलांना विहिरीत टाकलं आणि स्वत: देखील उडी मारली. पण एक देवमाणूस तिथे आला. त्याने जीवाची पर्वा न करता तिघांना विहरीतून बाहेर काढलं आणि त्यांचे प्राण वाचवले. अक्कलकोट तालुक्यातील हिरोळी येथे भाग्यवंती मंदीराजवळ असलेल्या विहिरीत एका महिलेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिने मुलाना विहिरीत ढकलून देत स्व:ता आत्महत्या करण्यासाठी विहीरीत उडी घेतली. या दरम्यान गावातील युवक बसवराज काशिनाथ पोमाजी यांनी ही घटना पाहिली. त्यांनी तातडीने स्वताःच्या जीवाची पर्वा न करता आईसह तीनही जणांना विहिरीतून बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. बसवराज यांच्या या कामगिरीचं गावासह तालुक्यात कौतुक होत आहे. (एव्हरग्रीन हॉटेलमध्ये प्रेयसीला नेलं, नंतर वाद, नाराज प्रियकराचं टोकाचं पाऊल, गोंदियातील धक्कादायक प्रकार) महिलेने आत्महत्येसारखे पाऊल का उचललं? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. याबाबत मात्र अद्यापही अक्कलकोट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गोंदियातही तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न दरम्यान, गोंदियातही एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आली आहे. प्रेयसीवर नाराज झालेल्या एका तरुणाने संतापात टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. या तरुणाने प्रेयसीवर नाराज होवून थेट स्वत:चा जीव संपवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी या तरुणाने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदियातील एव्हरग्रीन हॉटेलमध्ये संबंधित घटना घडली आहे. विशेष म्हणजे एव्हरग्रीन हॉटेलमध्ये गेल्या आठ महिन्यातील ही तिसरी घटना आहे. या हॉटेलमध्ये घडत असलेल्या सततच्या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. व्हरग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्रियकराचे शतक जांगडे असं नाव आहे. तो 23 वर्षांचा आहे. तसेत तो गोंदियातील आंबाटोली फुलचुर येथील रहिवासी आहे. तो आपल्या प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये थांबला असताना दोघांमध्ये भांडण झालं. या भांडणाच्या रागातून शतकने विष प्राशन करून टोकाचा निर्णय घेतला आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. शतकने टोकाचा निर्णय घेतल्यानंतर हॉटेल प्रशासनाला याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या प्रियकरावर गोंदियातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Crime, Suicide

पुढील बातम्या