मॉब लिंचिंगमध्ये व्यक्तीचा झाला होता मृत्यू, श्राद्ध घातल्यानंतर जिवंत आला घरी!

मॉब लिंचिंगमध्ये व्यक्तीचा झाला होता मृत्यू, श्राद्ध घातल्यानंतर जिवंत आला घरी!

मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू झालेला एक व्यक्तीचं पुन्हा जिवंत परत आला आहे. हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे.

  • Share this:

पटना(बिहार), 18 नोव्हेंबर : विज्ञात कितीही पुढे गेलं तरी मृत्यू झालेल्या व्यक्तीला जिवंत करण्याइतकं संशोधन झालेलं नाही. पण असा विश्वास न बसणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू झालेला एक व्यक्तीचं पुन्हा जिवंत परत आला आहे. हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे. जमावाने बेदम मारहाण करत एकाचा जिव घेतला. पण तोच व्यक्ती पुन्हा जिवंत परत आल्यामुळे पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.

बिहारच्या पटनामध्ये हा खळबळजनक प्रकार घडला आहे. ही घटना 10 ऑगस्ट रोजी पाटणा येथील नौबतपूर येथील महमदपूर गावात घडली. कृष्णा नावाच्या व्यक्तीला चोर म्हणून जमावाने बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर पोलिसांनी मॉब लिंचिंगमध्ये खुनाचा गुन्हादेखील दाखल केला होता. त्यानुसार 23 आरोपींना तुरूंगातही पाठवण्यात आलं होतं. कृष्णा यांच्या कुटुंबियांनीय त्यांचा अत्यविधीकर श्राद्ध घातलं. पण त्यानंतर घरी जिवंत परत आलेल्या कृष्णा यांना पाहिल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला.

इतर बातम्या - मुंबई: मॉर्निंग वॉकला गेलेल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण, 12 तास सामूहिक बलात्कार

कृष्णा यांच्या पत्नीने सांगितले की, पोलिसांनी तिला मृतदेह दाखवला. पण मृतदेहाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पण तो माझाच नवरा होता. पोलिसांच्या सांगण्यावरून मी मृतदेह ताब्यात घेतला आणि निघून आले. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करून श्राद्ध घातलं.

इतर बातम्या - ARTICAL 15: देश हादरला; 5 अल्पवयीन मुलींचं अपहरण, एकीचा सापडला मृतदेह

ते झालं असं की जो कृष्णा जिवंत परत आला तो राणी तालाब पोलिस स्टेशनच्या निसारपुराचा होता आणि ज्याला ठार मारण्यात आलं त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. पण यात गैरसमज झाला आणि ठार झालेला कृष्णा हा निसारपूरचा असल्याचं पोलिसांना वाटलं. नौबतपूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कृष्णाच्या हातावर टॅटू होते. त्यामुळे पोलिसांचा गोंधळ झाला.  कृष्णा परत आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी सुरू केली आहे.

मोठी बातमी - सोनिया गांधींच्या बैठकीनंतर पवारांनी पुन्हा सस्पेन्स वाढवला, शिवसेनेवर म्हणाले..

Published by: Renuka Dhaybar
First published: November 18, 2019, 7:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading