'आईची तब्येत बरी नाहीये, घरी चल'; 12 दिवसांनी धक्कादायक खुलासा

'आईची तब्येत बरी नाहीये, घरी चल'; 12 दिवसांनी धक्कादायक खुलासा

लॉकडाऊनमध्ये लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार

  • Share this:

पंढरपूर, 01 एप्रिल : माढा तालुक्यातील 8वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. 'तुझी आई आजारी आहे. तुला बोलावलं आहे' असं खोटं सांगून दोन मित्रांच्या मदतीने स्विफ्ट कारमधून घरी नेऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना 16 मार्च रोजी दुपारी घडली. मात्र, भीतीपोटी मुलीने न सांगितल्याने अखेर 12 दिवसांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

माढा तालुक्यातील अल्पवयीन मुलगी (वय 14) ही आठवीत शिक्षण घेत आहे. ती व तिचा लहान भाऊ हे दोघे सायकलवरून दररोज ये-जा करीत असतात. 16 मार्च रोजी 9.30 वा. बहीण-भाऊ दोघे नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेले होते. तर आई-वडील मोलमजुरीसाठी शेतात गेले होते.

सदर मुलगी ही मैत्रिणीबरोबर शाळेसमोरील दुकानात गेली असता तेथे आरोपी संदीप हनुमंत चव्हाण हा आपली स्विफ्ट कार घेऊन आला. भाऊ अनिल पवार, पोपट रमेश पवार या दोन मित्रांसह अगोदरपासून थांबला होता. त्याने संबंधित अल्पवयीन मुलीस तुझी आई खूप आजारी आहे. तुला बोलाविले आहे, असे खोटे सांगून दोघींना कारमध्ये बसवून गावात नेलं.

हे वाचा - मुंबईत अवघ्या 12 तासांमध्ये आढळले 16 नवे रुग्ण, राज्यात रुग्णांचा आकडा 320 वर

त्यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. 30 वा. सुमारास माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं नाटक करून आणि दमदाटी करीत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसंच ही घटना कोणास सांगितली असता तुला व तुझ्या घरातील कुणालाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

इतकंच नाही तर मुलीला पुन्हा शाळेत नेऊन सोडलं. यानंतर घरी गेल्यानंतर रडतरडत मुलीने घडला प्रकार आईस सांगितला. मात्र, जीवे मारण्याची धमकी दिल्याने भीतीपोटी सर्वजण गप्प राहिले. परत त्यांच्या माजी सैनिक असलेल्या दीरास ही घटना सांगितली. त्यांनी मी येतो, आल्यानंतर बघू असे सांगितले.

हे वाचा - महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बातमी, आठवड्याभरात उन्हाचा पारा वाढणार

मात्र, त्यानंतर लॉकडाऊनमुळे त्यांना येता आले नाही. यामुळे त्यांनी ही घटना मावस दिरास सांगितली. यामुळे तब्बल 12 दिवसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना माढा सत्र न्यायालयाने 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम करीत आहेत.

हे वाचा - मुंबईमध्ये कोरोनाचा आणखी एक मृत्यू, राज्यात मृतांचा आकडा 12वर

First published: April 1, 2020, 9:35 AM IST

ताज्या बातम्या