उद्या चढणार होता लग्नाचा रंग, आधीच झाली तरुणाची हत्या

तुमसर तालुक्यातील येरली गावात राहणाऱ्या विनोद कुंभरे या 26 वर्षीय तरुणांचा लग्नाच्या आधल्या दिवशीच गावालगत असलेल्या शेतशिवारात मृतदेह आढळून आला.

News18 Lokmat | Updated On: May 6, 2019 05:36 PM IST

उद्या चढणार होता लग्नाचा रंग, आधीच झाली तरुणाची हत्या

प्रविण तंडेकर, प्रतिनिधी

भंडारा, 06 मे : उद्या लग्न असल्याने घरात आनंदाचं वातावरण होतं. पण त्यानंतर असं काही झालं की संपूर्ण घरावर शोककळा पसरली आहे. विनोद कुंभरे या 26 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात घडला आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे विनोदचं मंगळवारी लग्न होणार होतं.

तुमसर तालुक्यातील येरली गावात राहणाऱ्या विनोद कुंभरे या 26 वर्षीय तरुणांचा लग्नाच्या आधल्या दिवशीच गावालगत असलेल्या शेतशिवारात  मृतदेह आढळून आला. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. त्याच्या मृतदेहाजावळ 2 चाकू  मिळाल्याने या तरुणांची हत्या करण्यात आली असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

विनोद कुंभरे हा चंद्रपूर जिल्ह्यात एका खाजगी कंपनीत कामावर होता. मंगळवारी त्याचं आणि त्याच्या लहान भावाचा लग्न असल्याने तो सुट्ट्यांवर गावी आला होता. रविवारी संध्याकाळी विनोद काही कामानिमित्त घराबाहेर गेला तो परातलाच नाही. सोमवारी सकाळी गावाशेजारील शेतावर त्याचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा : दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्काराच्या घटनेने पुणे हादरले, भावाने केला...

Loading...

घटनास्थळी विनोदच्या पोटावर एक मोठा चाकूचा करण्यात आला होता. आणि शरीराजवळ एक चाकू ठेवला होता. त्यामुळे त्याची चाकू भोकसून हत्या करण्यात आली असल्याचं सागंण्यात येत आहे. मात्र, चाकूवर रक्ताचे डाग दिसत नसल्याने हत्येचे ठिकाणं दुसरं असावं असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

ज्या घरासमोर आज लग्नाचा मंडप असायला पाहिजे होता. तिथं आज काळाने घात केला. आदिवासी कुटुंबातील विनोदच्या वडिलांचा मृत्यू झाला असून ते 3 भाऊ आणि बहीण असं कुटुंब आहे. मोलमजुरी करून कुटुंब चालविणाऱ्या विनोदची लग्नाच्या आधल्या दिवशी हत्या का करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, भंडारा पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. घटनास्थळावरून विनोदचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर विनोदची अशी निर्घृणरित्या हत्या का करण्यात आली याची चौकशी आता पोलीस करत आहेत.


SPECIAL REPORT : वंचित फॅक्टरमुळे सोलापुरात बदलले वारे, कुणाला बसणार धक्का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 05:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...