कचऱ्याच्या वादात वाहिला रक्ताचा पाट, तलवारीने वार केल्यामुळे एकाचा मृत्यू

कचरा टाकण्याच्या वादात एका तरुणांची तलवारीने वार करून हत्त्या करण्यात आली आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 06:37 PM IST

कचऱ्याच्या वादात वाहिला रक्ताचा पाट, तलवारीने वार केल्यामुळे एकाचा मृत्यू

भास्कर मेहरे, प्रतिनिधी

यवतमाळ, 18 जून : यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव शहरात दोन कुटुंबियांच्या कचरा टाकण्याच्या वादात एका तरुणांची तलवारीने वार करून हत्त्या करण्यात आली आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ओंकार नरवाडे असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

उमरखेड मार्गावर रहिवासी असलेल्या नरवाड़े आणि राठोड कुटुंबीयांमध्ये मंगळवारी घरासमोर कचरा टाकण्यावरून वाद झाला. नरवाड़े कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी गजानन राठोड संतप्त झाला. गजानन राठोड याने घराजवळ आलेल्या ओंकार नरवाड़े आणि त्याच्या सहकारी मनोज भरवाड़े, अक्षय कोपरकर यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्यामध्ये ओंकार नरवाड़ेच्या छातीवर सपासप वार केले गेल तर त्याच्या सहकाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला. यामध्ये ओंकार नरवाड़ेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मनोज भरवाड़े याच्यासह जखमीवर पुसद येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात आरोपी गजानन राठोड याने आत्मसमर्पण केलं आहे. घटनेची माहिती मिळताच शहरातील बाजारपेठ भीतीपोटी बंद करण्यात आल्या आहेत. शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर पोलीस आता प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Loading...

दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. साधा कचऱ्यावरून झालेला वाद एखाद्याच्या जीवावर बेतला यामुळे नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. तर ओंकारच्या जाण्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.


VIDEO : एकदा ऐकाच वाहतूक पोलिसाचं रॅप साँग, 'तेरा टाईम आयेंगा'!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...