Home /News /news /

वादळामुळं भिंत कोसळून युवक ठार तर शेतात उभं पीक झालं भुईसपाट

वादळामुळं भिंत कोसळून युवक ठार तर शेतात उभं पीक झालं भुईसपाट

खोलीतून दुर्गंधी आल्यानंतर रविवारी तिने दार ठोठावलं, मात्र आतून आवाज आला नाही.

खोलीतून दुर्गंधी आल्यानंतर रविवारी तिने दार ठोठावलं, मात्र आतून आवाज आला नाही.

अकोले कोपरगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात शेती आणि नागरी वस्तीत नुकसान झाले आहे.

 शिर्डी, 5 जून: निसर्ग चक्रीवादळाने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले आणि कोपरगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील फळबागांसह उभं पीक भुईसपाट झालं आहे तर घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दुसरीकडे अकोले तालुक्यात भिंत कोसळून एक युवक जागीच ठार झाला आहे. मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी निसर्ग चक्रीवादळाने संगमनेर, अकोले आणि कोपरगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतात असलेल्या केळीच्या बागा आणी डाळिंबाच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. संगमनेर तालुक्यात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून साधारण 350 घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हेही वाचा -त्या गर्भवती हत्तीणीला मारणाऱ्या नराधमांचा शोध सुरू; देशभरातून वाढला दबाव अकोले कोपरगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात शेती आणि नागरी वस्तीत नुकसान झाले आहे. कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर वादळाने कोसळला. अकोले तालुक्यात गुरूवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरु असून गेल्या 24 तासांत घाटघर परिसरात 132 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. हेही वाचा -हे प्या! ABVPच्या कार्यकर्त्यांनी रक्तच काढून प्लेट दिली अधिकाऱ्यांच्या हातात पावसामुळे घराची भिंत कोसळून अकोले तालुक्यातील 32 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शासनाकडून निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या