झारखंड, 13 मे : IPL चा अंतिम सामना संपल्यानंतर तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुभम असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. त्याने IPLचा अंतिम सामना संपल्यानंतर फाशी लावून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
मयत शुभमने IPL च्या सामन्यामध्ये पैसे लावले होते. पण तो सट्टेबाजीमध्ये हरल्यामुळे आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. शुभमने रात्री IPL चा अखेरचा सामना पाहिला आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली. शुभम नेहमी सट्टेबाजी करायचा.
शुभम 23 वर्षांचा होता. तो नेहमी सट्टेबाजी करायचा. झारखंडच्या बोकारोमधील माराफारी परिसरामध्ये तो शेजारच्या मुनिलाल यांच्या घराची देखरेख करायचा. मुनिलाल लग्नासाठी गावी गेला होता. त्याचवेळी हा संपूर्ण प्रकार घडला. पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.
हेही वाचा : महाराष्ट्राने गमावला उत्तम कॅरमपटू, डंपरच्या धडकेत मुंबईच्या जान्हवी मोरेचा जागीच मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनिलाल यांनी घराची देखरेख करण्यासाठी शुभमला घराची चावी देऊन ठेवली होती. IPL सामना झाल्यानंतर शुभम मुनिलाल यांच्या घरी देखरेखीसाठी गेला. पण तो सकाळी 8 वाजेपर्यंत घरी आला नाही. त्यामुळे शुभमच्या घरच्यांनी मुनिलाल यांच्या घरी धाव घेतली.
घराचा दरवाजा खूप वेळ ठोठावल्यानंतरही शुभमने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे घरच्यांनी दरवाजा तोडला आणि आतमध्ये गेले. घराच्या आत जाताच सगळ्यांना धक्का बसला. त्यांनी शुभमचा मृतदेह लटकलेला पाहिला. शुभमच्या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात एकच खळहळ उडाली आहे. तर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मुंबईतील ATMमध्ये तरुणीसमोर युवकाचं हस्तमैथुन, मुलीनेच शूट केला VIDEO