Elec-widget

नदीत अंघोळ करताना सगळ्यांच्या पुढे गेला..., डोळ्यांदेखत जिवाभावाच मित्र गमावला

नदीत अंघोळ करताना सगळ्यांच्या पुढे गेला..., डोळ्यांदेखत जिवाभावाच मित्र गमावला

डोळ्यासमोर जिवाभावाच्या मित्राला गमावल्यामुळे मित्रांवर शोककळा पसरली आहे तर गावात घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

  • Share this:

गडचिरोली, 13 नोव्हेंबर : मित्रांसोबत नदीवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवकाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात आरडा येथील गोदावरी नदीवर घडली आहे. डोळ्यासमोर जिवाभावाच्या मित्राला गमावल्यामुळे मित्रांवर शोककळा पसरली आहे तर गावात घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

नवीन वेंकटस्वामी कंबगोनी (19) असं मृतक युवकाचं नाव आहे. नवीन हा त्याच्या मित्रांसोबत नदीवर पोहोण्यासाठी गेला होता. आरडा येथील नवीन कंबगोनी आणि त्याचे काही मित्र गावाजवळील गोदावरी नदीवर सकाळच्या सुमारास आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, सर्वजण आंघोळ करीत असताना नवीन कंबगोनी हा खोल पाण्यात गेला. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

घटनेबाबत सिरोंचा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा शोध घेतला. 12 वाजताच्या सुमारास नवीन कंबगोनी याचा मृतदेह हाती लागला. पोलिसांनी नवीनचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आता संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहे.

मोठी बातमी - आमची भेटच सकारात्मक आहे, उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेसची प्रतिक्रिया

या संपूर्ण प्रकरणात अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस मृत तरुणाच्या मित्रांची चौकशी करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांआधी करमाळा जिल्ह्यामध्येही वडिल आणि मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच वेळी वडिल आणि मुलाचा मृत्यू झाला. करमाळा तालुक्यातील मलवडी येथील दुर्गुळे कोंढलकर वस्ती येथील विहिरीवर मुलाचा आणि वडिलांचा एकाच वेळी मृत्यू झाला होता. मुलाला पोहायला शिकवताना वडिलांचा आणि पोहायला शिकणाऱ्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती. या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.

Loading...

शिवाजी भीमराव कोंढलकर ( वय 35 वर्ष ) असं वडिलांचं तर सोनू शिवाजी कोंढलकर ( वय 11 वर्ष )असं मुलाचं नाव होतं. इयत्ता सहावी मध्ये अजितदादा पवार विद्यालय वडशिवणे इथे सोनू शिकत होता. हे दोघेही पोहण्यासाठी विहिरीत उतरले. वडिल शिवाजी हे सोनूला पोहायला शिकवण्यासाठी घेऊन गेले. पण सतत सुरू असलेल्या पावासामुळे विहिरीत पाण्याचं प्रमाण जास्त होतं. अशात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बाप-लेकाचाही मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2019 03:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com