मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मस्करीत तरुणाकडून रिव्हॉल्व्हरचा स्ट्रिगर दबून सुटली गोळी.. क्षणात खेळ खल्लास

मस्करीत तरुणाकडून रिव्हॉल्व्हरचा स्ट्रिगर दबून सुटली गोळी.. क्षणात खेळ खल्लास

मस्करी करणे एका तरुणाच्या जिवावर बेतले आहे. रिव्हॉल्व्हरची गोळी लागून एका तरुणाचा मृत्यू झाला.

मस्करी करणे एका तरुणाच्या जिवावर बेतले आहे. रिव्हॉल्व्हरची गोळी लागून एका तरुणाचा मृत्यू झाला.

मस्करी करणे एका तरुणाच्या जिवावर बेतले आहे. रिव्हॉल्व्हरची गोळी लागून एका तरुणाचा मृत्यू झाला.

उस्मानाबाद,29 फेब्रुवारी: मस्करी करणे एका तरुणाच्या जिवावर बेतले आहे. रिव्हॉल्व्हरची गोळी लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. भूम तालुक्यातील पाटसांगवी गावात शुक्रवारी दुपारी 4 वाजता ही घटना घडली. दस्तगीर जिलानी पटेल (वय-40) असे मृत तरुणाचे नाव आहे. बाबा शेख यांच्याकडील परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून दस्तगीर जिलानी पटेल याचा मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाबा शेख हा पुण्यात राहतो. तो काही कामानिमित्त पाटसांगवी गावात आला होता. दस्तगीरच्या घरात बाबा शेख हा त्याच्या इतर मित्रांसमवेत बसला होला. तिथेच त्यांचे जेवणाचे नियोजन करण्यात आले होते. त्यांनी मद्यप्राशन केल्यानंतर सगळे गप्पा मारत बसले होते. या दरम्यान बाबा शेख यांच्याकडे असलेली रिव्हॉल्व्हर दस्तगीर  हा न्याहळत होता. त्यांच्या मस्करीही सुरू होती. याचवेळी दस्तगीकडून रिव्हॉल्व्हरचा स्ट्रिगर दबून गोळी सुटली. गोळी दस्तगीरलाच लागली. गोळी लागताच दस्तगीर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने उपचारासाठी बार्शी येथे हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच भूमचे पोलिस निरीक्षत रामेश्वर खणाळ, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी पाटसांगवी गावी पोहोचले. घटनेबाबत माहिती जाणून घेतली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. हेही वाचा..भाजपच्या मेळाव्याला दानवेंची अनुपस्थिती, फोटो लावला नसल्याने नाराज झाल्याची चर्चा जामखेडमध्ये आठवडी बाजारातच गोळीबार.. दुसरीकडे, जामखेड शहरातील बीड रोडवर आठवडी बाजारात शुक्रवारी सकाळी 10 वाजता हवेत गोळीबार करण्यात आला. जुन्या वादातून हा गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या सर्व प्रकारानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण असून याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. जामखेड शहराचा आठवडी बाजार शनिवारी भरत असतो. हाच बाजारा सुरू झाल्यानंतर आज एका कापड दुकानासमोर गोळीबार झाला. 15 दिवसांपूर्वी संबंधित आरोपीचे आणि समोरील गटामध्ये वाद निर्माण झाला होता. हा वाद आज पुन्हा उफाळून आला. एका युवकाने हवेत गोळीबार केला यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हेही वाचा..पत्नी पळून गेली प्रियकरासोबत, तिला शोधण्यासाठी पतीने केलं भयकंर कृत्य! गोळीबारानंतर बघ्यांची एकच गर्दी जमली होती. गोळीबाराची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हे फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहे. या प्रकरणी पोलीसांनी एका संशयितास माहितीसाठी ताब्यात घेतले आहे. गोळीबारामुळे परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा झाल्याची नागरिकांमधून प्रतिक्रिया येत आहे. जामखेड शहरात गोळीबाराच्या वारंवार घटना घडत आहेत. दोन वर्षापूर्वी याच बीड रोडवरील मार्केट यार्ड समोर गोळीबार होऊन दुहेरी हत्याकांड घडले होते. शहरात गोळीबाराच्या वारंवार घटना घडत आसल्याने कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचे चित्र दिसत आहे. हेही वाचा..जिद्दीला सलाम! आजारी आहे, कमजोर नाही, गंभीर आजाराने ग्रस्त तरुणी ऑक्सिजन सिलेंडर लावून देतेय परीक्षा
First published:

Tags: Crime news, Maharashtra news, Marathwada, Osmanabad, Osmanabad news, Solapur news

पुढील बातम्या