गुरुवारी 3 तास बंद राहणार तुमचा टीव्ही, हे आहे मोठं कारण

गुरुवारी 3 तास बंद राहणार तुमचा टीव्ही, हे आहे मोठं कारण

29 तारखेनंतर तुम्हाला तुमचे आवडचे चॅनल पाहायला मिळतील की नाही याची खात्री नाही. कारण, 29 डिसेंबरपासून ट्राय म्हणजेच Telecom Regulatory Authority of India (TRAI)ची नवीन नियमावली लागू होतेय.

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर : प्रेक्षकहो, 29 तारखेनंतर तुम्हाला तुमचे आवडचे चॅनल पाहायला मिळतील की नाही याची खात्री नाही. कारण, 29 डिसेंबरपासून ट्राय म्हणजेच Telecom Regulatory Authority of India (TRAI)ची नवीन नियमावली लागू होतेय.

पण यासगळ्यावर नाराज होत केबल ऑपरेटर्स  गुरुवारी 3 तास म्हणजे संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत केबल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमावलीसंदर्भात तुम्ही-आम्हीच नाही तर केबल ऑपरेटर्सदेखील तेवढेच संभ्रमात आहेत.

29 डिसेंबरपासून टेलिफोन रेग्युलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडिया, म्हणजेच ट्रायच्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मात्र या नव्या नियमावलीनुसार आपल्याला पाहिजे ते चॅनल कसे निवडायचे यासंदर्भात प्रेक्षकांबरोबर केबल ऑपरेटर्सही संभ्रमात असल्याचं दिसतंय.

कसे निवडाल तुमचे आवडते चॅनल?

- 130 रुपये अधिक जीएसटीची रक्कम भरल्यानंतर ग्राहकांना 100 चॅनल पाहता येतील

- या 100 चॅनलमध्ये दूरदर्शनच्या 26 चॅनल्सचा समावेश असेल

- आणखी 20 रुपये भरण्याची तयारी असल्यास ग्राहकांना 130 चॅनल व्यतिरिक्त आणखी 25 चॅनल पाहता येतील

- याशिवाय ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल पाहायचे असतील तर त्या चॅनलचं MRP शुल्क भरावं लागेल

- ट्रायच्या नियमानुसार हे एमआरपी शुल्क 1 ते 19 रुपयांच्या दरम्यान असणार आहे

मात्र ट्रायच्या नव्या नियमानं केबल ऑपरेटर्सना संभ्रमात टाकलंय. त्यामुळे आता असे खालील काही प्रश्न डोक्यात येतात.

- बेसिक पॅकमध्ये दाखवण्यात येणारे 100 चॅनेल कोणते असतील?

- ग्राहकांच्या आवडीचे चॅनल दाखवण्यासाठी सेटअप बॉक्समधले तांत्रिक बदल कसे करायचे?

- आवडीचे चॅनेल निवडण्यासाठी ग्राहकांनी कुणाशी, कधी आणि कसा संपर्क साधायचा?

दरम्यान,  ट्रायनं केबल ऑपरेटर्सना लवकरात लवकर कॉल सेंटर आणि हेल्पलाईन सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. मात्र 29 डिसेंबरची डेडलाईन पाहता हे सोपस्कर पाडण्यासाठी पुरेसा अवधी मिळत नसल्याची तक्रार ऐकायला मिळते.

ट्रायच्या नव्या नियमावलीमुळं ग्राहकांचे पैसे वाचणार असले तरी, नियमावलीच्या अंमलबजावणीसंदर्भात असलेल्या अस्पष्टतेमुळं नाराजीचा सूर ऐकायला मिळतो.

VIDEO : 2019 मध्ये या राशीची लोकं होतील मालामाल आणि यांना राहावं लागेल सावध

 

First published: December 26, 2018, 1:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading