शुक्रवार ठरला 'आत्महत्या'वार, भिवंडीत तरुणाने गळफास घेऊन संपवले जीवन

शुक्रवार ठरला 'आत्महत्या'वार, भिवंडीत तरुणाने गळफास घेऊन संपवले जीवन

भिवंडी शहरातील फातिमानगर इथं एका झाडाला तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

भिवंडी, 10 जुलै : भिवंडी शहरातील  फातिमानगर इथं एका झाडाला तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राज्यात आज आत्महत्या केलेल्या प्रकरणातील ही चौथी घटना आहे.

सुफियान अन्सारी असं या तरुणाचं नाव आहे. सुफियानचा रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिकांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी या तरुणाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

प्राथमिक तपासातून  सुफियान अन्सारीने  आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  मात्र अद्याप कारण समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक  तपास करत आहे.

पुण्यात 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या

दरम्यान, आज राज्यात आत्महत्या प्रकरणाच्या चार घटना घडल्या आहे. पुण्यात Whatsapp वर स्टेटस अपलोड करून 24 वर्षांच्या इंजिनिअर अक्षय पोतदार या 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली.  तरुणाने  इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुणे जिल्ह्यातील मोशी परिसरात घडली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना कॉमेडियनचा तोल सुटला, नेटिझन्स संतापले

अक्षयनं चिखली परिसरातील साने चौकात मित्रांसह राहात होता. एका खासगी कंपनीत इंजिनियर पदावर काम करत होता. बुधवारी दुपारी त्यानं इमारतीच्या टेरेसवर जाण्यासाठी सिक्युरिटी गार्डकडे चावी मागितली मात्र सिक्युरिटीने दिली नाही. त्यानंतर दुसऱ्या सिक्युरिटी गार्डला फ्लॅट पाहायचा बहाणा केला आणि चावी घेतली. या तरुणानं 11 व्या मजल्यावरून आत्महत्या केली. हा फ्लॅट एक महिन्यापासून बंद आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

तर तिसरी घटनाही भोसरीमध्ये घडली आहे. ठेकेदाराने पगार न दिल्याने बांधकाम साईटवर काम करणाऱ्या सुपरवायझरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई)च्या परिसरात ही घटना घडली. 45 वर्षीय रवींद्र सिंग असं गळफास घेऊन मृत पावलेल्या सुपरवायझरचे नाव आहे.

रुग्णांचा लूट! कोरोनाच्या महामारीत पुण्यात उघडकीस आला धक्कादायक प्रकार

चौथी घटनाही उस्मानाबादेत घडली आहे. क्वारंटाइनमध्ये असलेल्या एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. येडशी गावातील सरपंच यांच्यासह बार्शी तालुक्यातील पांगरी गावातील 3 जण व येडशी गावातील 6 जण असे 9 जण हे पास काढून तिरुपती दर्शनासाठी गेले होते. गावात परत येताच या 6 लोकांना गावातील जिल्हापरिषद च्या शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. त्याने 3 दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Published by: sachin Salve
First published: July 10, 2020, 2:06 PM IST

ताज्या बातम्या