पुण्यात धक्कादायक प्रकार, लिफ्ट दिल्यानंतर तरुणीशी केले अश्लील चाळे, रागात इमारतीवरून फेकलं खाली!

पुण्यात धक्कादायक प्रकार, लिफ्ट दिल्यानंतर तरुणीशी केले अश्लील चाळे, रागात इमारतीवरून फेकलं खाली!

लिफ्ट दिल्यानंतर तरुणीशी अश्लील चाळे करून तरुणीने पैसे मागितल्यामुळे संतापलेल्या तरुणाने इमारतीवरून ढकलून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या सगळा प्रकार येरवडा परिसरातील आहे.

  • Share this:

पुणे, 10 डिसेंबर : देशभरात बलात्कार, हत्या, आत्महत्या अशा गंभीर घटना समोर येत असताना पुण्यात असाच एक मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. लिफ्ट दिल्यानंतर तरुणीशी अश्लील चाळे करून तरुणीने पैसे मागितल्यामुळे संतापलेल्या तरुणाने इमारतीवरून ढकलून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या सगळा प्रकार येरवडा परिसरातील आहे. त्यानंतर तिचा मृतदेह होळकर ब्रीजखाली फेकून दिला. या प्रकरणात खडकी पोलिसांता तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव पार्कमधील एका इमारतीवरून तरुणाने तरुणीला खाली ढकलून तिची हत्या केली. आश्रफ सय्यद (वय 20)असं संशयिताचं नाव आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून एका तरुणीने आरोपीकडे लिफ्ट मागितली. रात्र असल्याने संशयिताने तिला ल्फिट दिली. त्यावेळी तिने खडकीत सोडण्यास सांगितलं. पण संशयिताने तिला मधेच उतरवलं. मात्र, तरुणीने येरवडा परिसरात सोडण्याचा हट्ट धरला.

इतर बातम्या - 'या' तीन कारणामुळे रखडलं होतं ठाकरे सरकारचं खातेवाटप, वाचा INSIDE STORY

त्यानंतर संशयित तरुणाने तिला कोरदाव पार्कमध्ये बहिणीच्या घरी नेलं. तिथे तरुणीला टेरेसवर घेऊन जात त्यांच्यामध्ये अश्लील चाळे झाले. यानंतर तरुणीने संशयित तरुणाके 5 हजार रुपयांची मागणी केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि रागात तरुणाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तिला खाली फेकलं.

यामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, होळकर ब्रीजखाली तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रकरणाचा उलगडा झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

इतर बातम्या- लग्नानंतर दोघेही आत्महत्येसाठी गेले पण पत्नीने डोळ्यांदेखत पाहिला पतीचाच मृत्यू!

पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर मृत तरुणीच्या कुटुंबियांना या सर्व प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. या सर्व घटलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं.

इतर बातम्या - घरी आल्यानंतर व्हायरल झाला लता दीदींचा 'हा' PHOTO, पाहून वाढेल चिंता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: crime pune
First Published: Dec 10, 2019 04:05 PM IST

ताज्या बातम्या