धक्कादायक; मुंबईच्या गर्दीने घेतला तरुणीचा जीव, क्षणात झालं होत्याचं नव्हतं!

धक्कादायक; मुंबईच्या गर्दीने घेतला तरुणीचा जीव, क्षणात झालं होत्याचं नव्हतं!

कामावर लेट मार्क लागू नये याकरता चार्मीने गर्दीतून लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला आणि तिला जागा मिळाली तिथे ती लोकल ट्रेनमध्ये शिरली.

  • Share this:

मुंबई, 16 डिसेंबर : लोकलच्या गर्दीमुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. लोकलमधून पडून एका युवतीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चार्मी पासद असं मृत्यू झालेल्या युवतीचं नाव आहे. मयत तरुणी देसलेपाडा भोपर इथे राहणारी आहे. सकाळी 9 वाजता लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. लोकल ट्रेनमध्ये वाढत्या गर्दीमुळे पुन्हा एकदा एका डोंबिवलीकराला आपला जीव गमवावा लागला आहे.

आज सकाळी चार्मीने 9च्या दरम्यान डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 5वरून मुंबईच्या दिशेने जाणारी फास्ट लोकल पकडली. मात्र, नेहमीप्रमाणे जास्त गर्दी होती. पण कामावर लेट मार्क लागू नये याकरता चार्मीने गर्दीतून लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला आणि तिला जागा मिळाली तिथे ती लोकल ट्रेनमध्ये शिरली.

इतर बातम्या - माहिम सूटकेस हत्याकांडात आधार कार्डामुळे नवं ट्वीस्ट, आरोपी लेकीबद्दल खुलासा

मात्र, लोकल ट्रेनच्या दरवाज्यावरच तिला कशीबशी जागा मिळाली. तरीही ती आत जाण्याचा प्रयत्न करत होती पण कोपर येथे रेल्वेच्या आतून लोड आला आणि दरवाज्यावर उभ्या असलेल्या चार्मीचा तोल गेला. ती डोंबिवली कोपर दरम्यान धावत्या लोकलमधून पडली. ज्यात तिला गंभीर जखमा झाल्या होत्या. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं गेलं मात्र तिथे तिला डॉक्टरांनी मयत घोषित केलं.

इतर बातम्या - कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद

चार्मीच्या मृत्यूने पुन्हा एकदा डोंबिवलीहून रेल्वेने जीवघेणा प्रवास करणा-या डोंबिवलीकरांच्या समस्येला वाचा फुटली आहे. सकाळी गर्दीच्या वेळेस थेट डोंबिवलीहून जास्त फास्ट लोकल सुटल्या तर पुढे डोंबिवली ते ठाणे दरम्यान रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल. गर्दी कमी होईल तसंच रेल्वेवर ताण पडणार नाही आणि पर्यायाने गर्दीमुळे होणारे अपघाती मृत्यू रोखले जातील. पण रेल्वे प्रशाशान याकडे नेमहीप्रमाणे दुर्लक्ष करतील असंच दिसतं आहे.

इतर बातम्या - दिल्ली, यूपीनंतर मुंबईतूनही निषेध सुरू, TISSमध्ये विद्यार्थ्यांकडून बहिष्कार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2019 02:51 PM IST

ताज्या बातम्या