नागपूरमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह, अॅसिडने चेहरा विद्रुप तर एक हात तोडला!

तरुणीची ओळख पटू नये यासाठी चेहऱ्यावर अॅसिड फेकून चेहरा विद्रुप करण्यात आला असावा तर तरुणीचा एक हातदेखील तोडला गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2019 12:14 PM IST

नागपूरमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह, अॅसिडने चेहरा विद्रुप तर एक हात तोडला!

नागपूर, 13 जुलै : तरुणीचा चेहरा विद्रुप करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे 25 ते 30 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. केळवद पोलीस स्टेशन अंतर्गत पांढुर्णा - नागपूर महामार्गावर सावली फाटा जवळची ही घटना आहे.

स्थानिकांनी सकाळच्या वेळी मृतदेह पाहिल्यानंतर या प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली आहे. तरुणीची ओळख पटू नये यासाठी चेहऱ्यावर अॅसिड फेकून चेहरा विद्रुप करण्यात आला असावा तर तरुणीचा एक हातदेखील तोडला गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तरुणीची अशा पद्धतीने हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे.

पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिकांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर तरुणीची हत्या दुसऱ्या ठिकाणी करण्यात आला आणि त्यानंतर मृतेदह दुसरीकडे फेकला असा पोलिसांचा अंदाज आहे.

तिहेरी हत्याकांडाने नवी मुंबई हादरली, डोक्यात आणि पोटात वार करून केले मर्डर

नवी मुंबईमध्ये तिहेरी हत्याकांड झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुर्भे एमआयडीसीमध्ये भंगार विक्री करणाऱ्या तिघांची हत्या करण्यात आली आहे. तीक्ष्ण हत्याराने त्यांच्या डोक्यात आणि पोटात वार करून हत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 9च्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे.

Loading...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बंद कंपनीत मृत तिघांचे भंगाराचे दुकान होते. रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळच्या वेळी रक्ताच्या थारोळ्यात तिघांचे मृतदेह पाहिल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

इर्शाद वय 20 वर्ष, नौशाद वय 17 वर्ष, राजेश वय 28 अशी हत्या झालेल्या तीघांची नावं आहे. वर्षआर्थिक वादातून किंवा चोरीच्या उद्देशाने या तिघांची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच बंद कंपनीतून तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

एकाच वेळी, एकाच ठिकाणी तिघांचे मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे. पण अद्याप हत्या कोणी आणि का केली याचं ठोस कारण समजू शकलेलं नाही. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

दरम्यान, मृतांची माहिती मिळवण्यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शी आणि शेजाऱ्यांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

बस स्थानकातच महिलेनं केली दोन तरुणांची तुफान धुलाई, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 12:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...