लातूर, 26 जानेवारी : आजच्या प्रजासत्ताक दिनी लातूरच्या अहमदपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी निघालेल्या 2 तरुणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
गोविंद दहिफले आणि पूजा भोसले असं मृत तरुण आणि तरुणीचं नाव आहे. हे दोघे दुचाकीवरून झेंडा वंदन आणि एनसीसीच्या परेडसाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.
रस्त्यावर दुचाकी वेगात स्लीप झाली आहे. त्यामुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अहमदपुर येथील महाविद्यालयात हे दोघेही 11वीमध्ये शिकत होते. प्रजासत्ताक दिनी आपल्या मित्रांना अशा पद्धतीने गमावल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमधील गोविंद दहिफले हा किनगाव इथं राहणारा होता तर पूजा भोसले ही कोळवाडी इथं राहणारी विद्यार्थीनी आहे. या धक्कादायक घटनेनंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
हा घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरून दोघांचाही मृतदेह ताब्यात घेतला आणि नंतर तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली आहे. त्यानुसार पोलीस आता तपास करत आहेत. तर आपल्या तरुण मुलांना असं अकाली गमावल्याने दोघांच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर संपूर्ण कॉलेजवर शोककळा पसरली आहे.
VIDEO: बायकोला प्रियकरासोबत रंगे हात पकडलं, पतीने भर रस्त्यात घातला राडा