घरातले झोपले होते, हताश तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या!

घरातले झोपले होते, हताश तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या!

सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, त्यात कुटुंब जगवायच कसं या विवंचनेतून 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील राजेवाडी गावांत रविवारी सकाळी उघडकीस आली.

  • Share this:

बीड, 14 जुलै : कुटुंब जगवायच कसं या विवंचनेतून 26 वर्षीय तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. कर्जाचा डोंगर आणि शेतीतून पदरात पडणारी निराशा शेतकऱ्यांच्या जीवाशी रोज खेळतेय. त्यामुळे बळीराजाच्या आत्महत्येचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि त्यात कुटुंबाची जबाबदारी पेलता न आल्यामुळे तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, त्यात कुटुंब जगवायच कसं या विवंचनेतून 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील राजेवाडी गावांत रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेश गंगाधर घुबडे असं आत्महत्या केलेल्या मयत शेतकऱ्यांचं नाव आहे.

राजेवाडी गावांतील गणेश घुबडे या शेतकऱ्यांची अडीच एक्कर शेती आहे. गेल्या वर्षी 25 ते 30 हजार रुपये उसने घेऊन शेतीत पेरणी केली. पण, दुष्काळामुळे पदरात काहीच पडलं नाही. यातच 2016 मध्ये लग्न झालं. वडिलांचं अकाली निधन, यात कुटुंबांची जबाबदारी यामुळे लोकांकडून कर्ज घेऊन कुटुंब चालवलं. पैसे घेतांना जमीन गहाण ठेवली.

शेतात पिकं आल्यानंतर पैशे देता येतील. मात्र, दुष्काळाने काहीच पिकलं नाही. खासगी कर्जाचा वाढता डोंगर या विवंचनेतून गणेशने राहत्या घरात आत्महत्या केली. रात्री सर्वजण झोपले असताना गळफास घेऊन गणेशने जीवन संपवलं अशी माहिती  नातेवाईकांनी दिली आहे.

गणेशला एक वर्षाची लहान मुलगी आहे. घरातील कर्ता व्यक्ती निघून गेल्याने घुबडे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऐन तारुण्यात गणेशच्या पत्नीवर वैधव्याची कऱ्हाड कोसळली आहे.

VIDEO: '...म्हणून शरद पवारांनी पार्थला बारामतीचं तिकीट दिलं नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2019 01:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading