मुख्यमंत्री महोदय, आणखी एका शेतकऱ्याची कर्जामुळे आत्महत्या; 2 चिमुकली मुलं वाऱ्यावर!

मुख्यमंत्री महोदय, आणखी एका शेतकऱ्याची कर्जामुळे आत्महत्या; 2 चिमुकली मुलं वाऱ्यावर!

निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे नापिकी ओढवली. या सगळ्यावर हरोडे त्रस्त झाले होते.

  • Share this:

येवला, 13 ऑक्टोबर : मोर्शी तालुक्यातील येवला येथील यूवा शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या संपूर्ण राज्यामध्ये विधानसभेचं वार आहे. प्रत्येक पक्षाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी आश्वासन दिली जात असताना खरं पाहिला गेलं तर शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागत नसल्याचं या घटनेमुळे समोर आलं आहे. तरुण शेतकऱ्याच्या अशा आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संतोष हरोडे असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. त्याच्याकडे 4 एकर शेती आहे. शेतीसाठी हरोडे यांनी आतापर्यंत साडे तीन लाख रुपये कर्ज काढलं. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे नापिकी ओढवली. या सगळ्यावर हरोडे त्रस्त झाले होते. कर्ज कसं फेडावं आणि मुलांचं पालनपोषण कसं करावं याचा सतत विचार करत होते. याच नैराश्यातून त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या - PMC नंतर आणखी एका बँकेत कोटींचा घोटाळा, 1 लाख खातेदार पैसे काढू शकणार नाहीत!

अखेर येवला जवळच्या अमरावती नरखेड रेल्वे मार्गावर संतोष यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी घरातील कपड्यामध्ये चिट्ठी लिहून ठेवली होती. त्या चिट्ठीमध्ये त्यांनी कुटुंबाची माफी सुध्दा मागितली होती. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण हरोडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ज्याच्या जीवावर घरात चूल पेटत होती तोच आता या जगात नसल्यामुळे लहान लेकरांनी कोणाकडे बघायचं असा मोठा प्रश्न हरोडे कुटुंबासमोर आहे.

इतर बातम्या - दिवसा कडक ऊन सायंकाळी वाऱ्यासह पावसाच्या सरी, असं आहे आज राज्यातलं हवामान!

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक असल्यामुळे सगळी आश्वासनांच्या खैरी सुरू आहेत. अशात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. संतोष यांच्या आत्महत्येमुळे खरंच सामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली का? त्याचा त्यांना फायदा झाला का? असा प्रश्न उपस्थित होतो.

इतर बातम्या - महाराष्ट्र जिंकण्यासाठी आज मोदी, अमित शहा मैदानात; सत्ताधारी, विरोधकांमध्ये टशन

Published by: Renuka Dhaybar
First published: October 13, 2019, 11:07 AM IST

ताज्या बातम्या