लॉकडाऊनमध्ये सगळ्यात धक्कादायक बातमी, इंटरनेटचा रिचार्ज केला नाही म्हणून तरुणानं उललं टोकाचं पाऊल

लॉकडाऊनमध्ये सगळ्यात धक्कादायक बातमी, इंटरनेटचा रिचार्ज केला नाही म्हणून तरुणानं उललं टोकाचं पाऊल

इंटरनेट सेवा या युगातील प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. इंटरनेटमुळे जीवन सोपं झालं आहे, म्हणूनच मोबाइल आणि इंटरनेटची व्यसन काही लोकांसाठी जीवघेणा ठरली आहे.

  • Share this:

भोपाळ (मध्य प्रदेश), 25 : कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे मनोरंजानासाठी सगळेच जण इंटरनेटचा वापर करतात. पण या इंटरनेटमुळे आत्महत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंटरनेट सेवा या युगातील प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. इंटरनेटमुळे जीवन सोपं झालं आहे, म्हणूनच मोबाइल आणि इंटरनेटची व्यसन काही लोकांसाठी जीवघेणा ठरली आहे. कानात इयरफोन घातल्यामुळे अपघात झाल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या असतील. आता चक्क इंटरनेट पॅक रिचार्ज न केल्यानं एका युवकानं आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

कोरोनानंतर देशात आणखी एक संकट, या 5 राज्यांना दिला रेड अलर्ट

ही घटना मध्य प्रदेशची आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या मते भोपाळच्या बागसेव्हानिया पोलीस स्टेशन भागात राहणाऱ्या एका 20 वर्षीय व्यक्तीनं आपल्या पालकांना मोबाइल फोनमध्ये इंटरनेट पॅक रिचार्ज करण्यास सांगितल. पण बऱ्याच वेळा सांगूनही जेव्हा कुटुंबीयांनी इंटरनेट रिचार्ज केला नाही तेव्हा तरूणाने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

या संदर्भात बागसेव्हानिया पोलीस स्टेशनचे एसएचओ एस शर्मा यांनी सांगितलं की, आईने रीचार्ज करण्यास नकार दिल्यानं तरूणानं आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

लहान मुलांनीच केला आई खूनी असल्याचा खुलासा, 'आधी पप्पांना खुर्चीवर बांधलं आणि...

विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे उद्योग आणि व्यापार सर्वच सुमारे दोन महिने बंद होतं. त्यामुळे रिचार्ज पटकन करणं शक्य झालं नसल्याचं पालकांनी म्हटलं. अशा कठीण काळात जेव्हा लोक दोन वेळेच्या खाण्यासाठी प्रयत्न करत असतात, तिथे इंटरनेटचं व्यसन ही एक नवीन समस्या बनत आहे. अशा घटना चिंताजनक आहेत.

कोरोनावर मात करण्यासाठी तुमच्याकडेही आहे लस, तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

First published: May 25, 2020, 2:43 PM IST
Tags: suicide

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading