मित्रांच्या खोट्या आरोपामुळे केली आत्महत्या, जाण्याआधी व्हॉट्सअॅपवर टाकलं स्टेटस

मित्रांच्या खोट्या आरोपामुळे केली आत्महत्या, जाण्याआधी व्हॉट्सअॅपवर टाकलं स्टेटस

मैत्री होण्यासाठी वेळ लागतो पण ती मैत्री तुटण्यासाठी वेळ लागत नाही हे खरं आहे. याचं जिवंत उदाहरण शिर्डीच्या राहुरीमध्ये समोर आलं आहे.

  • Share this:

हरिष दिमोटे, प्रतिनिधी

शिर्डी, 16 ऑक्टोबर : मैत्री होण्यासाठी वेळ लागतो पण ती मैत्री तुटण्यासाठी वेळ लागत नाही हे खरं आहे. याचं जिवंत उदाहरण शिर्डीच्या राहुरीमध्ये समोर आलं आहे. मित्राने केलेल्या आरोपामुळे व्यथित होऊन एक तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याने जाताना व्हॉट्सअॅपवर स्टेटस टाकत मी आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आहे.

राहुरी येथे 23 वर्षाच्या मनोज ससाणे याने मुळा धरणात उडी मारून आत्महत्या केली आहे. जाताना त्याने व्हॉट्सअॅपवर 'good bye zindagi' असं स्टेटस ठेवत माझ्याकडून काही चुकलं तर माफ करा पण विनाकारण बदनाम झालेलं आयुष्य जगण्यात काय मजा आहे, असं म्हणत त्याने त्याचं आयुष्य संपवलं आहे.

मनोजने मुळा धरणात उडी घेत आत्महत्या केली आहे. चूक नसताना मित्रांनी खोटे आरोप केल्यामुळे मनोजने हा टोकाचा निर्णय घेतला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध (भा.द.वि कलम ३०६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, काल रात्री मनोजचा मृतदेह धरणात तरंगताना मित्रांना दिसला. ते झालं असं की, मनोज हा एका जनरल स्टोअरमध्ये काम करतो. काल दुपारच्या दरम्यान त्याचे काही मित्र आले आणि त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. पण मित्रांनी केलेले आरोप खोटे होते, त्यातून मनोज नाराज झाला आणि तो स्टोअरमधील मालकाची गाडी घेऊन धरणावर गेला.

तिथे त्याने मी आत्महत्या करत असल्याचं व्हॉट्सअॅप स्टेटस टाकलं आणि धरणात उडी टाकली. त्याच्या काही मित्रांनी हे स्टेटस पाहताच धरणाकडे धाव घेतली पण तेव्हा तिथे फक्त गाडीच दिसून आली. त्यानंतर मनोजची शोधाशोध सुरू झाली पण तो कुठेही सापडला नाही.

रात्रीच्या सुमारात मनोजचा मृतदेह धरणात आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो आज सकाळी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तर या सगळ्या प्रकाराविरूद्ध 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान, मनोजच्या अशा अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहेत तर परिसरातही याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कहर! एक पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2018 01:19 PM IST

ताज्या बातम्या