दिवाळीच्या उत्सवात महाराष्ट्रात दुसरी हत्या, 3 जणांनी चाकूने भोसकून मित्राला संपवलं!

दिवाळीच्या उत्सवात महाराष्ट्रात दुसरी हत्या, 3 जणांनी चाकूने भोसकून मित्राला संपवलं!

रविवारी लक्ष्मीपुजनाच्या रात्री एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

  • Share this:

नागपूर, 28 ऑक्टोबर : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना औरंगाबादनंतर आता नागपूरमध्ये हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या उदयनगर चौकात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दिवाळीच्या सणाला तरुणाची हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी लक्ष्मीपुजनाच्या रात्री एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

रात्री बारा वाजताच्या दरम्यान हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत उदयनगर चौकातील जितू बडे (वय 29) नावाच्या तरुणाची तीन आरोपींनी चाकूने भोसकून हत्या केली. आपापसात झालेल्या शुल्लक वादातून ही हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मारेकरी हुडकेश्वर शेष नगरातील असून यात प्रसाद रोकडे नावाच्या आरोपीचा समावेश आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

पोलिसांना हत्येची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पोलिसांनी जितूचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शववच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर घरातील तरुण मुलाल अशा प्रकारे गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

इतर बातम्या - दिवाळीला गालबोट, Happy Diwali म्हटला म्हणून तरुणाची तलवारीने हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करणारे तीन आरोपी असून तिन्ही आरोपी  फरार आहेत. त्यानुसार पुढील तपास सुरू असल्याचेही हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी सांगितलं. दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस घटनास्थळी स्थानिक नागरिकांची चौकशी करत असल्याचीही माहिती आहे.

इतर बातम्या - साडीमुळे चंद्रकांत पाटील गोत्यात, थेट निवडणूक रद्द करण्याची मागणी

First published: October 28, 2019, 5:09 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading