सेल्फीच्या मोहात तरुण वयातच गमावला जीव, साताऱ्यातली धक्कादायक घटना

सेल्फीच्या मोहात तरुण वयातच गमावला जीव, साताऱ्यातली धक्कादायक घटना

लॉकडाऊने नियम मोडत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे.

  • Share this:

सातारा, 24 ऑगस्ट : पावसाळा म्हटलं की पर्यटकांची आणि फिरायला जाणाऱ्या तरुणांची धूम असते. पण यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे सगळी पर्यटन स्थळं बंद आहे. धबधबे आणि डोंगरांत फिरण्यासाठी जाण्यावर बंदी आहे. पण तरीदेखील लॉकडाऊने नियम मोडत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. यावेळी सेल्फीच्या मोहात त्याने जीव गमावल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यामध्ये सेल्फीच्या नादाच एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील बलकवडी धरणावर ही घटना घडली आहे. वाईतल्याच पसरणीतला अजय महांगडे वय 22 असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. अजयच्या अशा जाण्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आणि त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

सोनिया गांधींवरून काँग्रेसमध्ये वाद पेटला, सुनिल केदारांची आक्रमक प्रतिक्रिया

अजयच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सगळे मित्र बलकवाडी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी सगळेजण मस्ती करत फोटो काढत होते. तेव्हा अजय धरणाच्या अगदी कडेला उभं राहून सेल्फी काढत होता. त्यावेळी त्याचा तोल गेला आणि तो धरण क्षेत्रात पडला.

कोरोनाचा गर्भ नाभीवरही गंभीर परिणाम, मुंबईत गर्भपाताच्या प्रकरणाने डॉक्टर हैराण

पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे अशात पोहता येत नसल्यामुळे अजयचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी असलेल्या मित्रांनी तात्काळ या घटनेची कुटुंबियांना आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अजयचा मृतदेह बाहेर काढला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

डोळ्यांदेखल आपल्या मित्राला असं गमावल्यामुळे मित्रांमध्ये शोककळा पसरली असून तरुण वयात मुलाला गमावल्यामुळे महांगडे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 24, 2020, 12:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या