धक्कादायक! कब्रिस्थानमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह

पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर असलेल्या कब्रिस्थानमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 02:40 PM IST

धक्कादायक! कब्रिस्थानमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह

बीड, 02 सप्टेंबर : परळी शहरातील गणेशपार भागातील बावीस वर्षीय तरुणाचा परळी पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर असलेल्या कब्रिस्थानमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. प्रथम दर्शनी घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. अनिल बस्वेश्वर हालगे वय 22 वर्षे  असं मयत तरुणाचं नाव आहे. सोमवारी सकाळी कब्रस्तानमध्ये त्याचा मृतदेह आढळून आल्याने सर्वञ भीतीचं वातावरण आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. त्यात अशा घटना समोर येत असल्यामुळे तरुणाईमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कब्रिस्थानमधून युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

कब्रिस्थानमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मिळालेल्या युवकाची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर हत्या नेमकी का करण्यात आली याबद्दल अद्याप काहीही समजू शकलेलं नाही. परळीत हत्येच्या आणि खूनाच्या घटनां वाढल्या आहेत. मागच्या दोन महिन्यापूर्वी माजी नगरसेवकाचा भर रस्त्यात खून करण्यात आला होता. त्यामुळे परळीत पोलिसांचा धाक राहिला नाही का असा प्रश्न आहे.

बहिणीची शेजारच्या मित्रासोबत सुरू होती Love Story, भावाला समजताच प्रियकराची अशी लावली वाट!

प्रेम प्रकरणातून गुन्हा होण्याचं प्रमाण वाढलं आहे. प्रेम केल्याची मोठी किम्मत एका जोडप्याला चुकवावी लागली आहे. बहिणीचं प्रेम प्रकरण घरी समजल्यानंतर कुटुंबीयांना राग अनावर झाला आणि त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. कुटुंबीयांनी फक्त प्रेमी युगुलाला एकमेकांपासून वेगळं तर केलंच पण त्यांनी केलेल्या प्रकारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

Loading...

या प्रकरणी रायपूरच्या डीडी नगर पोलिसांनी रविवारी तरुणीच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तर पीडित तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. बहिणीसोबत प्रेम प्रकरण ठेवल्यामुळे रागात भावाने तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या - ... तर राष्ट्रवादी दिसणारच नाही, अमित शहांचा पवारांवर घणाघात

हा सगळा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमध्ये घडला आहे. डीडी नगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरच्या चांगोराभाठा इथे राहणाऱ्या देवगन ध्रुवचं घराजवळ राहणाऱ्या युवतीशी प्रेमसंबंध होते. मुलीच्या कुटूंबाला हे कळताच त्यांनी मुलीला फूफाकडे राहण्यासाठी पाठवलं. पण संधी मिळताच मुलगी रायपूरला आली आणि मुलाला भेटली.

इतर बातम्या -  राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसला धक्का, या आमदाराने गुंडाळला झेंडा!

आज मुलगी तिचा प्रियकर देवगन ध्रुवसमवेत अग्रोहा कॉलनीत होती. दरम्यान, त्याचे नातेवाईक तेथे पोहोचले आणि या दोघांचे अपहरण केले आणि त्या युवकाला जोरदार मारहाण केली. एवढेच नाही तर जिवे मारण्याची धमकीही दिली. प्रेयसी आणि प्रियकर एका कॉलोनीमध्ये राहत होते. तरुणीच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यानंतर जे झालं ते धक्कादायक होतं.

तरुणीचे कुटुंबीयांनी रंगे हात युगुलाला घरात पकडलं. त्यानंतर तरुणीच्या भावाने तिला बाहेर पाठवलं आणि तरुणाची बेदम मारहाण केली. त्याला वेळीच थांबवलं नसतं तर पीडित प्रियकराचा जीव गेला असता अशी माहिती पोलिसांनी दिली.

VIDEO: डान्सचा जलवा चाहत्यांच्या शिट्ट्या; हिला म्हणतात पाकची सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 02:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...