आतापर्यंत लाच घेतल्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील हा VIDEO पाहून अवाक् व्हाल!

आतापर्यंत लाच घेतल्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील हा VIDEO पाहून अवाक् व्हाल!

कोरोनाच्या संकटात नफेखोरी आणि लाचखोरीचं प्रमाणही प्रचंड वाढलं आहे. संधीसाधू लोकांचं या काळात खूप फावलं असून असे अनेक प्रकार समोर येत आहेत.

  • Share this:

लखनऊ, 10 मे : कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) सध्याच्या काळात उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh)शामली (Shamali) इथे नफेखोरी आणि लाचखोरीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. संधीसाधू लोकांचं खूप फावलं आहे. असाच लाच स्वीकारण्याचा एक प्रकार अलीकडेच उघडकीला आला आहे. शामली येथे एका आरोग्य कर्मचाऱ्याने कोरोनारुग्णाला ऑक्सिजन सिलिंडर (Oxygen Cylinder) मिळवून देण्याच्या नावाखाली 10 हजार रुपयांची लाच (Bribe)घेतली. संजय कुमार (Sanjay Kumar)असं त्या लाचखोर कर्मचाऱ्याचं नाव असल्याचं बोललं जात आहे. शामली इथल्या कोविड हॉस्पिटल एल टू येथे तो कार्यरत आहे.

ज्या रुग्णाकरिता ऑक्सिजन सिलिंडर घेण्याकरिता त्या कर्मचाऱ्याने लाच घेतली होती, त्या रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी असा आरोप केला आहे, की लाच घेऊनही त्या कर्मचाऱ्याने रिकामा ऑक्सिजन सिलिंडर दिला. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. या कारणावरून नातेवाईकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. हा गोंधळ वाढायला लागल्यानंतर सीएमएस डॉ. सफल कुमार यांनी तो कर्मचारी आणि रुग्णाचे नातेवाईक अशा दोन्ही बाजूंना आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं. त्या लाचखोर कर्मचाऱ्याला त्या अधिकाऱ्याने लाचेचे पैसे परत करायला लावले. तसंच, मृताच्या नातेवाईकांच्या गोंधळात लाचखोर कर्मचाऱ्याने मृत व्यक्तीच्या पत्नीच्या पायावर डोकं ठेवून माफीही मागितली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केल्यानंतर या लाचखोर कर्मचाऱ्यावर आरोग्य विभागाकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, आदर्श मंडी पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात पाठवलं आहे.

हे ही वाचा-हृदयद्रावक! मातृदिनालाच आईला उचलावी लागली शहीद मुलाची तिरडी

ही घटना साधारण पाच दिवसांपूर्वीची आहे. हरडफतेहपूर गावातल्या सत्यवान यांना कोविड-19 उपचारांसाठी शामली संयुक्त जिल्हा चिकित्सालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती बिघडल्यावर ऑक्सिजनची गरज लागली. संजय कुमार नावाच्या आरोग्य कर्मचाऱ्याने सत्यवानयांच्या नातेवाईकांकडून 10 हजार रुपये घेतले आणि रिकामा ऑक्सिजन सिलिंडर आणून दिला. तो सिलिंडर लावल्यानंतर काहीच वेळात सत्यवान यांचा मृत्यू झाला.

सिलिंडर रिकामा होता असं कळल्यावर सत्यवान यांचे नातेवाईक चिडले आणि त्यांनी संजय कुमार यांना मारहाण केली. त्याच वेळी आदर्शमंडी (Adarshmandi Police) पोलिस तेथे पोहोचले. त्यांना सगळी घटना मृतांच्या नातेवाईकांकडून कळल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल करून संजय कुमारला अटक केली.

त्यानंतर शनिवारी हा व्हिडिओ समोर आला आणि व्हायरल (Viral Video)झाला, तेव्हा या घटनेची आणखी एक बाजू उघड झाली. हॉस्पिटलचे प्रभारी डॉ. सफलकुमार यांच्यासमोर आरोपी संजय कुमार माफी मागत असल्याचं दिसत आहे. त्याच्या हातात एक पाकीट असून, त्यात लाच म्हणून स्वीकारलेले पैसे आहेत. दोन मिनिटं आठ सेकंदाच्या या व्हिडिओत मृताची पत्नी आणि आणखी एक व्यक्ती ही दिसत आहे. दोन-तीन तरुण मोबाइलवरून व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत. मृताची पत्नी आणि नातेवाईक संजय कुमारला काही तरी रागाने बोलत आहेत. त्याने तिच्या हातात पाकीट देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नातेवाईकांनी त्याला पैसे मोजून देण्यास सांगितलं. त्याने पाठ वळवून पैसे मोजले आणि मृताच्या पत्नीला ते पैसे परत घेण्याचा धोशा लावला. तिचे पाय पकडून त्याने माफी मागितल्याचंही व्हिडिओत दिसत आहे.

First published: May 10, 2021, 11:00 PM IST

ताज्या बातम्या