मुंबई, 8 मार्च : मुंबईच्या विशेष हॉलिडे कोर्टाने येस बँकेचे (Yes Bank) संस्थापक राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत प्रवर्तन संचालनालयाकडे (ईडी) कोठडी सुनावली आहे. ईडीने रविवारी पहाटे राणा कपूरला अटक केली. दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) च्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना अटक झाली आणि आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
शनिवारी ईडीने राणा कपूर यांची वरीळीतील समुद्रमहाल निवासस्थानी चौकशी सुरू होती. येस बँकेच्या प्रमोटर राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून 600 कोटी रुपये मिळाले होते, याची ईडी चौकशी करीत आहे.
संबंधित - येस बॅंक घोटाळा : राणा कपूर आणि प्रियंका गांधींचं कनेक्शन असल्याची शक्यता
भ्रष्टाचारामध्ये सामील असलेल्या डीएचएफएलने बँकेने दिलेल्या 4,450 कोटी रुपयांसाठी कंपनीला पैसे दिले, ज्याची चौकशी सुरू होती. ईडी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, येस बँकेनं डीएचएफएलला 3,750 कोटी रुपये आणि डीएचएफएलच्या नियंत्रणाखाली असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना 750 कोटींचे कर्ज दिलं आहे. शुक्रवारी बँकेचे सीईओ राणा कपूर यांच्या घरावर छापे मारण्यात आले होते. अंमलबजावणी संचालनालया(ईडी)ने राणा कपूर यांच्या घरावर छापे मारले होते. ईडीने राणा कपूर यांच्या वरळी येथील घरावर छापे मारले. डीएचएलएफ(DHFL)ला कर्ज दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. येस बँकेनं DHFL ला तब्बल 3600 कोटींचं कर्ज दिलं होतं.
दरम्यान या प्रकरणाच नवीन खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात येस बँकेचे सीईओ राणा कपूर आणि काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांचं काही कनेक्शन असल्याचा तपास आयकर विभागाकडून केला जात आहे.
Mumbai's Special Holiday Court sends #YesBank founder Rana Kapoor to Enforcement Directorate custody till 11th March. He was yesterday arrested by the ED and produced today in the Court. pic.twitter.com/rFCTE4Kjbg
— ANI (@ANI) March 8, 2020
राणा कपूर यांचा 'गांधींज'बरोबर संबंध असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी वाड़्रा यांची पेंटिग युपीए सरकारदरम्यान राणा कपूर यांनी 2 कोटी रुपयांना खरेदी केल्याची माहिती 'द टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तसमूहाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. राणा कपूर यांना अटक केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. राणा कपूर व प्रियंका गांधी यांच्यामध्ये झालेल्या या व्यवहाराचा तपास आयकर विभागाकडून करण्यात येत आहे. या पेंटिग्स खरेदी करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
संबंधित - येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांच्या घरावर ईडीचे छापे