पिवळ्या साडीतील ती बोल्ड महिला अधिकारी सलमानची फॅन, व्यक्त केली एक इच्छा

पिवळ्या साडीतील ती बोल्ड महिला अधिकारी सलमानची फॅन, व्यक्त केली एक इच्छा

व्हायरल झालेल्या बातमीत त्यांच्या मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण वास्तवात ७० टक्केच मतदान झालं होतं.

  • Share this:

लखनऊ, 16 मे- यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत एका महिला अधिकाऱ्याच्या फोटोंचीच चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. ‘पिवळ्या साडीवाली’ या नावानेच तिला सोशल मीडियावर ओळखलं जात आहे. या पिवळ्या साडीतल्या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे रीना द्विवेदी असं आहे. न्यूज १८शी बोलताना रीना म्हणाल्या की, ती सलमान खानची फार मोठी चाहती आहे. तसेच लोक तिच्याजवळ जाऊन तू बिग बॉसची पुढील स्पर्धक असल्याचं म्हणतात. याबद्दल सविस्तर बोलताना रीना म्हणाल्या की, ‘सध्या तरी माझ्याकडे अशी कोणतीही ऑफर आली नसून, अशी एखादी ऑफर आली तर त्याचा नक्कीच स्वीकार करेन.’ रिना यांना सिनेमाच्याही ऑफर मिळाल्या होत्या. पण मुलासाठी त्यांनी सर्व सिनेमांना नकार दिला.

Inside Photos- कधीकाळी विकी कौशल असाही दिसायचा यावर तुमचा विश्वास बसणार नाही

रीना आता एवढ्या प्रसिद्ध झाल्या की लोक त्यांच्याजवळ येऊन सेल्फी काढण्याची विनंती करतात. तसेच अनेकजण त्यांची मुलाखत घेण्यासाठी रिना यांना सतत फोन करत असतात. सोशल मीडियामधूनही अनेकजण शूट करतात.

रिना यांचं लग्न २००४ मध्ये पीडब्ल्यूडी विभागात काम करणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक संजय द्विवेदी यांच्याशी झालं होतं. पण २०१३ मध्ये प्रदीर्घ आजाराने संजय यांचं निधन झालं. रिना यांच्या प्रसिद्धीचा फायदा सध्या त्यांच्या कुटुंबियांनाही मिळत आहे.

‘लस्ट स्टोरीज’मधील तो सीन पाहून किआरा आडवाणीच्या आजीने दिली होती ही प्रतिक्रिया

रिना द्विवेदी यांचा १३ वर्षांचा मुलगा आहे. जो लखनऊ येथील एलपीएसमध्ये शिकतो. आदित्य द्विवेदी यंदा तो १० वीत शिकत असून त्याला मोठं होऊन आयएएस व्हायचं आहे. शाळेत आदित्यचे सर्व मित्र त्याला त्याची आई स्टार असल्याचं सांगतात. माझ्या आईला एक ओळख मिळाली हे पाहून मला फार आनंद होतो.

शुटिंगवेळी या 5 अभिनेत्यांचा झालेला अपघात, विकीला तर पडले 13 टाके

मोहनलालगंज येथील नगराम मतदान केंद्रावर ड्यूटी करताना त्यांच्या बूथवर ७० टक्के मतदान झालं होतं. रिना यांनी हेही सांगितलं होतं की, व्हायरल झालेल्या बातमीत त्यांच्या मतदान केंद्रावर १०० टक्के  मतदान झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण वास्तवात ७० टक्केच मतदान झालं होतं.

Cannes 2019 - कंगना रणौतने 10 दिवसांमध्ये कमी केलं 5 किलो वजन, लोक म्हणाले- अशक्यच!

पुलवामातील 3 दहशतवाद्यांच्या एन्काउंटरनंतरचा LIVE VIDEO

First published: May 16, 2019, 3:16 PM IST
Tags: bigg boss

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading