बंगळुरू, 17 मे : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे बी. एस. येडियुरप्पा यांनी शपथ घेताच कामाला लागले आहे. येडियुरप्पांनी जिथे काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार थांबले आहे त्या ईगल टन रिसाॅर्टची सुरक्षाच काढून घेतलीये.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेचा पेच निर्माण झाला. अखेर हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचलाय. पण राज्यपालांच्या सुचनेनुसार बी.एस. येडियुरप्पा यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, भाजपकडे अजूनही बहुमत नाही. त्यामुळे घोडेबाजाराला ऊत येणार आहे.
याचीच खबरदारी म्हणून काँग्रेस आणि जेडीएसने आपल्या सर्व आमदारांना बंगळुरूमधील ईगल टन या पंचतारांकीत रिसाॅर्टमध्ये राहण्याची व्यवस्था केलीये. आमदार फूट नये याची काँग्रेस आणि जेडीएस खबरदारी घेत आहे.
आज दुपारी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ईगल टन रिसाॅर्टची सुरक्षा व्यवस्था काढून घेतलीये. सर्व पोलिसांची वाहन रिसाॅर्टमधून बाहेर आली आहे. त्यामुळे आता काँग्रेस आमदारांच्या संरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी रिसोर्ट बाहेर गर्दी केलीये. सर्व आमदारांना सांभाळण्यासाठी काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.