'त्या' 18 शेतकऱ्यांच्या शरीरात विषाचे अंश सापडलेच नाही !

'त्या' 18 शेतकऱ्यांच्या शरीरात विषाचे अंश सापडलेच नाही !

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिन्यात विषारी कीटकनाशकांनी मृत्यू पावलेल्या 18 शेतकऱ्यांच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये कीटकनाशकांचा अंशच आढळलेला नाहीये !!! न्यायवैद्यक प्रयोगशाळेनंच हा अहवाल दिल्याचं पुणे कृषी आयुक्तालयानं म्हटलंय. याच अहवाला आधार घेऊन यवतमाळमधील शेतकऱ्यांचे मृत्यू हे किटकनाशकांच्या बाधेमुळे झालेच नसल्याची बोंब आता किटकनाशक कंपन्यांनी मारायला सुरुवात केलीये.

  • Share this:

यवतमाळ, 09 नोव्हेंबर : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिन्यात विषारी कीटकनाशकांनी मृत्यू पावलेल्या 18 शेतकऱ्यांच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये कीटकनाशकांचा अंशच आढळलेला नाहीये !!! न्यायवैद्यक प्रयोगशाळेनंच हा अहवाल दिल्याचं पुणे कृषी आयुक्तालयानं म्हटलंय. याच अहवाला आधार घेऊन यवतमाळमधील शेतकऱ्यांचे मृत्यू हे किटकनाशकांच्या बाधेमुळे झालेच नसल्याची बोंब आता किटकनाशक कंपन्यांनी मारायला सुरुवात केलीये. ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये किटकनाशकांना अंश सापडलाच नाही, असा दावा कंपन्यांनी केलाय. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे कृषी विभागाचा हा गोपनीय अहवाल शासकीय अधिकाऱ्यांनीच कंपन्यांपर्यंत पोहचवल्याचा आरोप किशोर तिवारींनी केलाय.

दरम्यान, या मयत शेतकऱ्यांना उपचारादरम्यान, एन्डीडोज दिले गेले होते, त्यामुळे त्यांच्या शरिरात विषाचा अंश राहिला नसावा, असा खुलासा डॉक्टरांनी केलाय. एखाद्या रुग्णाला बिषबाधा झाल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी अॅन्टीडोज दिले जातात. त्यामुळे अनेकच्या त्याच्या उत्तरीय रक्त तपासणीत विषाचा अंश नाहिसा होऊ शकतो. त्यामुळे याच न्यायवैद्यक अहवालाचा आधार घेऊन किटकनाशक कंपन्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी चालवलेली धडपड ही खचितच केविलवाणी आहे. कारण, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल काहीही आला तरी शेतकऱ्यांना त्यावेळी किटकनाशक फवारणीमुळेच विषबाधा झाली होती ही वस्तूस्थिती कोणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे कीटकनाशक कंपन्या कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत असंही सांगितलं जातंय.

अतिजहाल कीटकनाशकं शेतकऱ्यांच्या हाती देऊन कीटकनाशक कंपन्यांनी त्यांच्या जीवाशी खेळ केलाय. अशा कंपन्यांना अद्दल घडवलीच पाहिजे, अशी शेतकऱ्यांमधून मागणी होतेय.

First published: November 9, 2017, 4:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading