यवतमाळमध्ये नरभक्षक वाघाने घेतला १३ वा बळी

यवतमाळमध्ये नरभक्षक वाघाने घेतला १३ वा बळी

वनविभागाकडून वाघासाठी हत्तीचा सापळाही रचण्यात आला होता

  • Share this:

यवतमाळ, ०५ ऑगस्ट- राळेगाव तालुक्यातील वेडशी जंगल शिवारात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुरख्याचा वाघाने फडशा पाडला. गुलाब मोकाशी असे मृत गुरख्याचे नाव असून दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. राळेगाव तालुक्यातील ही १३ वी घटना आहे. आतापर्यंत मृत पावलेल्या व्यक्तींमध्ये शेतकरी आणि मजुरांचीच संख्या जास्त आहे. गेल्या दीड वर्षांपासून या नरभक्षक वाघाने तिथल्या लोकांमध्ये एक भितीचं वातावरण निर्माण केलं आहे.

या वाघाला पकडण्यासाठी आमदार अशोक विके यांनी वनविभागाशी संपर्क साधून अनेक प्रयत्न केले. वनविभागाकडून वाघासाठी हत्तीचा सापळाही रचण्यात आला होता. मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. आता वनविभागाकडून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देऊ केली आहे. उन्हाळ्यात गावातील जनता घराबाहेर पडण्यासाठीही घाबरायची. गेल्या दोन महिन्यात वाघ शांत बसल्याने शेतकरी आणि मजूर त्यांच्या कामासाठी घराबाहेर पडले होते. मात्र पुन्हा एकदा वाघाने हल्ला केल्याने गावात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हेही वाचा- 

८ लोकांनी गरोदर बकरीवर केला सामुहिक बलात्कार

 पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षावाले बनले महापौर, राहुल जाधव 80 मतांनी विजयी

सासरच्यांनी विवाहितेला खांबाला बांधून जिवंत जाळलं,आरोपी अजूनही मोकाटच

First published: August 5, 2018, 12:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading