S M L

पोहण्याचा हट्ट् जीवावर बेतला, बांधकामाच्या खड्डात बुडून 3 मित्रांचा मृत्यू

Updated On: Sep 9, 2018 12:03 PM IST

पोहण्याचा हट्ट् जीवावर बेतला, बांधकामाच्या खड्डात बुडून 3 मित्रांचा मृत्यू

यवतमाळ, 09 सप्टेंबर : यवतमाळच्या पांढरकवडा शहरात समाज कल्याण वसतिगृहाच्या बांधकामासाठी तात्पुरत्या स्वरुपात पाणी मिळावे म्हणून खड्डा तयार करण्यात आला. पण या खड्ड्याने 3 जणांचा जीव घेतला आहे. दुर्दैवाने या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक हा गंभीर जखमी होता. पण उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी ८.३० दरम्यान घडली आहे.

हे तिघेही मित्र पोहण्यासाठी या खड्ड्याजवळ गेले होते. या खड्ड्याच्या बाजूला या तिघांनीही त्यांच्या सायकल उभ्या केल्या होत्या. या तिघांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली, पण पाण्याचा अंदाज न आल्याने या तिघांचाही मृत्यू झाला आहे. यातील 2 विद्यार्थ्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसही घटना दाखल झाले आहे. या तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या दुर्देवी घटनेबद्दल मृतांच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं आहे. तेही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

तिन्ही विद्यार्थ्यांच्या अशा अकाली जाण्याने कुटुंबियांवर दुखाचा डोंगर पसरला आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.

 

Loading...
Loading...

फाटलेल्या नोटांचे नियम 'RBI'ने बदलले, आता याच नोटा होणार 'EXCHANGE'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2018 12:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close