केदारनाथ मंदिराची कपाटं उघडली, विस क्विंटल फुलांनी सजवलं मंदिर!

केदारनाथ मंदिराची कपाटं उघडली, विस क्विंटल फुलांनी सजवलं मंदिर!

चार पवित्र धामांपैकी एक असलेल्या उत्तराखंडमधल्या केदारनाथ मंदिराची कपाटं आज उघडली. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर ही कपाटं उघडण्यात आली असून यात्रेला आजपासून सुरूवात झालीय.

  • Share this:

डेहराडून,ता.29 एप्रिल: चार पवित्र धामांपैकी एक असलेल्या उत्तराखंडमधल्या केदारनाथ मंदिराची कपाटं आज उघडली. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर ही कपाटं उघडण्यात आली असून यात्रेला आजपासून सुरूवात झालीय. विशेष पुजेनंतर सकाळी सहा वाजता दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं. यावेळी देशभरातून भाविक केदारनाथला आले होते. कपाटं सुरू होण्याचा दिवस हा केदारनाथमधला सर्वात मोठा उत्सव असतो. सर्व मंदिर आणि परिसर झेंडुंच्या फुलांनी सजवण्यात आलं. त्यासाठी 20 क्लिंटल फुलांचा वापर करण्यात आला.

सकाळी चार वाजता पुजेला सुरूवात

सकाळी चार वाजता ब्रम्हमुर्हूर्तावर कपाट उघडण्याच्या विधीला सुरूवात झाली. केदारनाथच्या विशेष पुजाऱ्यांनी मंत्रोच्चारात रूद्राभिषेक केला. विविध पुजा बांधण्यात आल्या आणि महाआरतीनंतर भोलेनाथांच्या जय जयकारात दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं.

परंपरेनुसार 6 महिन्यांपर्यंत देव ऊखीमठातल्या ओंकारेश्वर मंदिरात राहतात. हिवाळ्यात प्रचंड हिमवर्षाव होत असल्यानं केदारनाथचा पूर्ण परिसर बर्फाच्छादित असतो. कपाटं उघडण्याच्या दिवशी ऊखीमठातून पालखी केदारनाथला येते. पुढची सहा महिने भगवान शंकरदेव आता केदारनाथमंध्येच राहणार असल्याची श्रद्धा आहे.

सोमवारी बद्रिनाथ मंदिराची कपाटं उघडणार

सोमवारी म्हणजे 30 एप्रिलला बद्रिनाथ मंदिराची कपाटही उघडणार आहेत. सकाळी चार नंतर विशेष पुजा आणि अभिषेकानंतर कपाटं उघडणार असून मंदिर दर्शनासाठी खुलं होणार आहे. 18 एप्रिलला गंगोत्री आणि यमुनेत्री मंदिराची कपाटं उघडली होती. या मंदिरांची कपाटं उघडली म्हणजे चारधाम यात्रीची सुरूवात मानली जाते.

लेझर शोचं आकर्षण

केदारनाथची महिमा सांगणारा लेझर शो हे यावेळी आकर्षण राहणार आहे. कालपासून हा शो सुरू झाला असून दररोज होणारा हा शो भाविकांचं आकर्षण राहणार आहे.

First published: April 29, 2018, 10:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading