अकोल्यात यशवंत सिन्हा यांनी पोलीस मुख्यालयातच पथारी टाकली !

अकोल्यात यशवंत सिन्हा यांनी पोलीस मुख्यालयातच पथारी टाकली !

भाजपचे बंडखोर नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी चक्क पोलीस मुख्यालयातील एका झाडाखालीच पथारी टाकलीय. सरकार जोपर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आपण येथून हलणार नाही, अशा निर्धारच त्यांनी केलाय.

  • Share this:

04 डिसेंबर, अकोला : भाजपचे बंडखोर नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी चक्क पोलीस मुख्यालयातील एका झाडाखालीच पथारी टाकलीय. सरकार जोपर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आपण येथून हलणार नाही, अशा निर्धारच त्यांनी केलाय.

कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज अकोल्यात यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी जागरमंचने दिवसभर आंदोलन केलं. पण प्रारंभी जिल्हा प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनकडेच धाव घेतली असता पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेऊन पोलीस मुख्यालयात आणलं पण तिथं गेल्यावर यशवंत सिन्हा यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय इथून हलणार नाही असा पवित्रा घेत तिथल्याच एका झाडाखाली पथारी टाकली. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. तातडीने त्यांच्या 6 मागण्या देखील मान्य करण्यात आल्या. पण सातवी मागणी करणं आपल्या हातात नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याने यशवंत सिन्हा अजूनही तिथंच ठाण मांडून बसलेत. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हलणार नाही, असा निर्धारच त्यांनी केलाय. यशवंत सिन्हा यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर आणि इतर शेतकरी आंदोलकही ठिय्या मांडून बसलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2017 11:28 PM IST

ताज्या बातम्या