धक्कादायक! पत्नीचा इतर पुरुषांसोबत अश्लील VIDEO पतीने पाहिला, धक्क्याने केली आत्महत्या

धक्कादायक! पत्नीचा इतर पुरुषांसोबत अश्लील VIDEO पतीने पाहिला, धक्क्याने केली आत्महत्या

लग्न झालं असतानाही महिलेने इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. त्याचा व्हिडिओही लिक झाला होता.

  • Share this:

यमुनानगर(हरियाणा), 06 नोव्हेंबर : पत्नीचा इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न झालं असतानाही महिलेने इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. त्याचा व्हिडिओही लिक झाला होता. हा व्हिडिओ पतीने पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमिन हादरली. आणि रागाच्या भरात पतीने आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

मिळालेल्या माहितीनुसार, यमुनानगरमधील जगाधरी येथे राहणाऱ्या बलबीर सिंगच्या पत्नीने गेल्या काही दिवसांपासून इतर पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्याचाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो बलबीर यांनी पाहिला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बलबीरचे मानसिक संतूलन बिघडले आणि त्याने विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केली.

BIG BREAKING - महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी बातमी, अमित शहांकडून 'इट्स फायनल'

पत्नीने सासऱ्यांची पाय पकडून मागितली माफी

पतीने आत्महत्या केल्यानंतर घरातून पोलिसांना तीन पानी सुसाइड नोट सापडली. ज्यावर पत्नीच्या वागण्यामुळे धक्का बसला असल्याचं लिहण्यात आलं आहे. सुसाईड नोट समोर आल्यानंतर घरच्यांनाही धक्का बसला. सुसाईट नोटमध्ये नाव आल्यामुळे पत्नीही घाबरली आणि तिने सासऱ्यांचे पाय धरून माफी मागितली.

इतर बातम्या - लेकीच्या लग्नाऐवजी वडिलांचे अंत्यसंस्कार, डोळ्यांत पाणी आणणारी शेतकऱ्याची कहाणी

या संदर्भात कुटुंबिय काही बोलले नसले तरी मृताच्या पत्नीने आपला सर्व गुन्हा कबूल केला आहे. बलबीरच्या पत्नीने कबूल केले आहे की, तिचे इतर पुरुषांशी अवैध संबंध होते. परंतु आता ती असं करणार नाही. पण या सगळ्यामध्ये घरातील मुलाला गमावल्यामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

पत्नीने तिच्या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली, परंतु पोलिसांपर्यंत पोहोचलेल्या सुसाइड नोटवर संभ्रम असल्याचं समोर आलं. याबाबत पोलीस आत्महत्येच्या नोटची बारीक चौकशी करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पीडित कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. तर आता पुढील तपास सुरू आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 6, 2019, 10:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading