अनोख्या लग्नाची गोष्ट! एका रुपयांत कन्यादान, आठवी फेरी घेतली ‘बेटी बचाओ’साठी

अनोख्या लग्नाची गोष्ट! एका रुपयांत कन्यादान, आठवी फेरी घेतली ‘बेटी बचाओ’साठी

वाचा भारतीय खेळाडूच्या लग्नाची अनोखी गोष्ट…

  • Share this:

नवी दिल्ली, 02 डिसेंबर : भारतीय संस्कृतीत लग्नामध्ये सप्तपदी या सात वचनांसाठी घेतल्या जातात. पण तुम्ही कधी लग्नात आठ फेऱ्या घेतल्या आहेत, असे ऐकले आहे का? पण असा प्रकार नुकत्याच भारतीय खेळाडूच्या लग्नात घडला. दंगल गर्ल म्हणून प्रसिध्द असलेल्या बबीता फोगट हिने भारतीय केसरी कुस्तीपटू विवेक सुहागबरोबर लग्न केले. रविवारी हा लग्नसोहळा मोठ्या दणक्यात पार पडला. मात्र या लग्नाची गोष्ट मात्र थोडी हटके आहे.

बबीता फोगटनं अगदी हटके लग्न केले. या लग्नात सप्तपदी नाही कर आठ फेरे घेण्यात आल्या. आठव्या फेरीत बबीता आणि विवेक यांनी 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' असा संदेश दिला. मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबाव्यतिरिक्त अनेक परदेशी पैलवानही या लग्नाच्या कार्यक्रमास पाहुणे म्हणून उपस्थित होते. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, बालली गावात कोणतेही देणगी, हुंडा न घेतला अगदी साध्या पध्दतीत हा विवाह करण्यात आल्या. मुख्य म्हणजे हुंडा न घेतला केवळ एका रुपयात कन्यादान करत हे लग्न पार पडले.

वाचा-लग्न बंधनात अडकला भारताचा स्टार क्रिकेटपटू, पण साजरा करणार नाही हनीमून

वाचा-VIDEO : क्रिएटीव्हिटीला तोड नाही! दोन मजल्यांऐवढी उंच सायकल कधी पाहिली का?

बबीता आणि विवेक यांचे रविवारी अतिशय सोप्या पद्धतीने हे लग्न झाले. या लग्नात केवळ 21 पाहुण्यांनी हजेरी लावली. तथापि, आज म्हणजेच 2 डिसेंबर रोजी दोन्ही पक्षांनी दिल्लीत एक मोठे रिसेप्शन ठेवले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्यासह देश-विदेशातील अनेक नेते, कुस्तीपटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

वाचा-World Record: असा डेब्यू होणे नाही; एकही धाव न देत घेतल्या 6 विकेट!

पाच वर्षापासून चरखी दादरी जिल्ह्यातील बलली गावात राहणारी बबीता फोगट आणि पश्चिम दिल्ली येथे राहणारा विवेक सुहाग यांच्यात मैत्री होती. दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान दोघांची भेट झाली. या भेटीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. यानंतर या दोघांनीही आपल्या कुटूंबाशी आपल्या नात्याबाबत माहिती दिली आणि लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. 2 जून रोजी त्यांच्या दोन्ही कुटुंबियांनी लग्नाला होकार दिला. यानंतर 1 डिसेंबरला त्यांचे लग्न झाले.

वाचा-चहाशिवाय काम होणार नाही! माणूस नव्हे चक्क घोड्याला लागली तलप, VIDEO VIRAL

या लग्नात नव्या जोडप्याने 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' या प्रतिज्ञेसह आठ फेऱ्या घेतल्या. त्याचबरोबर प्रत्येकाने एक-एक रोप लावून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले. हा संपूर्ण सोहळा हरियाणाच्या दादरी जिल्ह्यातील बलाली गावात झाला.

First published: December 2, 2019, 6:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या