सरकार लक्ष देणार का? रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू

सरकार लक्ष देणार का? रूग्णवाहिका नसल्यानं गडचिरोलीत नवजात बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू

वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं गडचिरोलीत 4 दिवसांत नवजात बाळासह एका गर्भवती मातेचा मृत्यू झाला तर चंद्रपूरमध्ये नऊ महिन्यांच्या गर्भवतीला सायकलवरून न्यावं लागलं.

  • Share this:

महेश तिवारी, प्रतिनिधी, गडचिरोली,ता. 24 मे: गडचिरोली-चंद्रपूर सारख्या दुर्गम आदिवासी भागासापून या आरोग्य सेवा अजूनही कोसोदूर आहेत. व्यवस्थेच्या हलगर्जीपणाचे तिथं कसे बळी जातात त्याची ही करूण कहाणी...

चंद्रपूर गडचिरोलीतल्या गेल्या चार दिवसांमधल्या तीन घटनांनी दुर्गम भागातल्या आरोग्यव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली गेली. यातल्या तीन महिलांच्या नशिबी जे आलं ते ऐकून काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. अहेरी तालुक्यातील ताटीगुडमटोलाच्या विनोदा पेंदामची रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून घरातच प्रसुती झाली. त्यानंतर नवजात बाळाची प्रकृती बिघडली.

पण त्यावेळीही रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्यानं अवघ्या काही तासांतच त्या बाळानं जगाचा निरोप घेतला. या घटनेच्या चौथ्या दिवशी पंधरा दिवसांच्या बाळंतीणीवरही अशीच वेळ ओढवली. रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यानं खासगी वाहनातून गडचिरोलीला नेईपर्यंत तिचा मृत्यू ओढवला. कमलापूर या एकाच आरोग्यकेंद्रातल्या या दोन धक्कादायक घटना.

तिसरी घटना चंद्रपूर जिल्ह्यातल्या पाटणच्या आरोग्य केंद्रातली आहे. इथं रुग्णवाहिकेला चालकच नव्हता. त्यामुळे कमल राठोड या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला तिच्या भावानं चक्क सायकलवरून पाटणला नेलं. पण तिथं गेल्यावर डॉक्टर आणि नर्स नसल्याचं समजलं. अखेर सोबत आलेल्या आईनंच तिची प्रसुती केली.

गडचिरोली-चंद्रपूरमध्ये अशा घटना यापूर्वीही अनेकदा घडल्यात. वेळेवर रुग्णवाहिका नसणे, डॉक्टर हजर नसणं हे प्रकार नित्याचेच...आदिवासींचे प्राण खुंटीला टांगून झोपी गेलेल्या या आरोग्ययंत्रणेला केव्हा जाग येणार हा खरा प्रश्न आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2018 06:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading