जगात भारी : हा आहे जगातला सर्वांत हुशार मुलगा; नवव्या वर्षीच झाला इंजिनीअर

जगात भारी : हा आहे जगातला सर्वांत हुशार मुलगा; नवव्या वर्षीच झाला इंजिनीअर

पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम 18 महिन्यात शिकणाऱ्या या हुशार मुलाला तुम्ही पाहिलं का?

  • Share this:

ब्रसेल्स (बेल्जियम), 21 नोव्हेंबर : वयाच्या नवव्या वर्षी तुमचा मुलगा, मुलगी, पुतण्या, पुतणी किंवा भाचेमंडळी शाळेत काय शिकतात ते तुम्हाला माहीत आहे? तोंडी गणितं, बालकविता, परिसर विज्ञान याचं बेसिक ज्ञान त्यांना असतं आणि त्याचं आपल्याला कौतुक असतं. पण याच वयात लॉरेंट सायमन्स नावाचा बेल्जियमचा हा मुलगा चक्क पदवीधर झाला आहे. पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम तो फक्त 18 महिन्यात शिकला. फक्त शिकला नाही, तर त्याने या प्रत्येक इयत्तेची परीक्षाही या दीड वर्षात दिली आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला.

असामान्य बुद्धिमत्ता आणि आकलनक्षमता असणाऱ्या लॉरेंटने लहान वयातच त्याच्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली. त्याच्या शिक्षकांनीही त्याच्या असामान्य बुद्धिमत्तेची दखल घेत त्याला नवनवीन विषय आणि त्यातील खोल अभ्यास शिकवला.

9 वर्षांच्या लॉरेंट सायमन्सचा बुद्ध्यांक 145 आहे. तो जगातला सर्वांत तरुण पदवीधर ठरला आहे. त्याने विद्यापीठाच्या पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आइनडोव्हेन तंत्रज्ञान विद्यापीठाची Eindhoven University of Technology इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी त्याला लवकरच प्रदान करण्यात येणार आहे.

लॉरेंट सायमन अर्धा बेल्जियन आणि अर्धा डच वंशाचा आहे. CNN ने दिलेल्या बातमीनुसार, सायमन्स आता इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये PhD करणार आहे. त्याच वेळी त्याने मेडिसिन विषयाचा अभ्यास सुरू केला आहे. म्हणजे आता तो लवकरच सर्वांत लहान डॉक्टरही होण्याच्या मार्गावर आहे.

First published: November 21, 2019, 7:53 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading