Home /News /news /

पृथ्वीवर नवं चिनी संकट, लवकरच अंतरिक्षातून कोसळणार रॉकेट

पृथ्वीवर नवं चिनी संकट, लवकरच अंतरिक्षातून कोसळणार रॉकेट

संपूर्ण जग बंद पाडणाऱ्या करोना व्हायरसचा उद्रेक चीननमध्येच झाला होता. त्यानंतर आणखी एक चीनी संकट जगावर आदळणार आहे.

    मुंबई, 28 जुलै : आपल्या धोरणामुळे जगाला वेठीस धरण्याचा चीनचा इतिहास सर्वांना माहिती आहे. संपूर्ण जग बंद पाडणाऱ्या करोना व्हायरसचा उद्रेक चीननमध्येच झाला होता.  आता चीनने अंतराळात केलेल्या प्रयोगांमुळे पुन्हा एकदा सर्वांची धास्ती वाढवली आहे. स्वत:चं अंतराळ स्थानक (Space Station) उभारण्यासाठी चीनने ‘लाँग मार्च 5B’ हे एक रॉकेट अवकाशात सोडलं होतं. त्याचा जवळपास 21 टन वजनाचा स्टेज पृथ्वीवर कोसळणार आहे. अंतराळातील कचऱ्याच्या स्वरूपातील हा तुकडा या महिन्याच्या शेवटपर्यंत पृथ्वीवर पडेल, असं वैज्ञांनिकांनी म्हटलं आहे. ‘एनडीटीव्ही हिंदीच्या गॅझेट 360’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. रॉकेटचं बाह्य आवारण एका आठवड्यापर्यंत अंतराळात राहू शकतं, असं स्पेस डॉट कॉमनं (Space.Com) ‘द एअरोस्पेस कॉर्पोरेशन सेंटर फॉर ऑर्बिटल रीएंट्री अँड डेब्रिस स्टडीज’च्या (कॉर्ड्स) संशोधकांच्या हवाल्याने म्हटलं आहे. यासंदर्भात यूएस स्पेस फोर्सच्या स्पेस सर्व्हिलन्स नेटवर्ककडून ट्रॅकिंग डाटा गोळा करण्यात आला आहे. त्या डाटाचं विश्लेषण करून संशोधकांनी रॉकेटचं बाह्य आवरण 31 जुलै 22 पर्यंत पृथ्वीच्या वायूमंडळात प्रवेश करणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. याआधीही ‘लाँग मार्च 5B’ च्या दोन मोहिमांवेळी असंच झालं होतं. 5 मे 2020 मध्ये रॉकेट लाँच केल्यानंतर त्याचं बाह्य आवरण जवळपास एक आठवड्यानंतर अनियंत्रत होऊन आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर पडलं होतं. दुसरं ‘लाँग मार्च 5B’ या तियांगोंगच्या कोर मॉड्यूलला लाँच केल्यानंतर ते 10 दिवसानंतर मे 2021 मध्ये हिंद महासागरात कोसळलं होतं. कुठं पडणार रॉकेट? दरम्यान, चीनच्या रॉकेटचा भाग पृथ्वीवर नेमका कुठे पडणार हे आताच सांगणं घाईचे ठरू शकतं, असं संशोधकांचं मत आहे. पण कॉर्ड्सच्या संशोधकांनी मात्र हे आवरण हे 41 अंश उत्तर अक्षांश आणि 41 अंश दक्षिण अक्षांशांदरम्यान पृथ्वीवर प्रवेश करेल असं म्हटलं आहे. त्याचे पूर्ण अवशेष हवेत जळून नष्ट होणार नाहीत, तर रॉकेटचा काही भाग म्हणजेच 20 ते 40 टक्के भाग पृथ्वीवर येऊन पडेल, असंही सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे रॉकेटच्या डिझाइनवर किती भाग कोसळणार हे ठरलेलं असलं तरी एअरोस्पेस कार्पोरेशनने 5 ते 9 मेट्रिक टन राडारोडा पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. Snake in Flight Meal : विमानातील जेवणात 'साप'; एअर हॉस्टेसने काही घास खाल्ले आणि....; Shocking Video चीनने आतापर्यंत तिसऱ्यांदा अंतराळातून कोसळणाऱ्या रॉकेटच्या आवरणाला नियंत्रित न करण्याचा पर्याय निवडल्याने मोठी अडचण निर्माण होऊ शकते. आजवर अंतराळातील स्वत:चं सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी अनेक देश स्पर्धा करत आहेत. यात प्रामुख्याने अमेरिका, रशिया, चीन, भारत या देशांची नावे येतात. चीनने तर त्यांच्या अंतराळ स्थानकाच्या निमिर्तीसाठी 2021 ते 2022 दरम्यान अनेक वेळा अंतराळ यानांना पाठवण्याची योजना बनवली. परंतु, अनियंत्रित झालेल्या रॉकेटमुळे पृथ्वीवर त्याचे अवशेष कोसळून मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    First published:

    Tags: China, World news

    पुढील बातम्या