Home /News /news /

World Lion Day: हा छोटा सिंह झोपलेला वाटेल, पण आहे 28,000 वर्षांपूर्वीचं शरीर; बर्फाच्या गुहेत सापडलेल्या छावा अजून आहे जसाच्या तसा

World Lion Day: हा छोटा सिंह झोपलेला वाटेल, पण आहे 28,000 वर्षांपूर्वीचं शरीर; बर्फाच्या गुहेत सापडलेल्या छावा अजून आहे जसाच्या तसा

World Lion Day निमित्त जगातल्या एका पुरातन सिंहाच्या छाव्याविषयी... बर्फाच्छादित गुहेत 28 हजार वर्षं जुना छाव्याचा देह (Lion Cubs) संशोधकांना (Researchers) सापडला आणि काय काय माहिती समोर आली वाचा...

    मॉस्को, 11 ऑगस्ट: सायबेरियातील एका बर्फाच्छादित गुहेत 28 हजार वर्ष जुना छाव्याचा देह (Lion Cubs) संशोधकांना (Researchers) सापडला असल्याची माहिती जागतिक सिंह दिनानिमित्त (world lion day) समोर आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गोठलेल्या (frozen) अवस्थेतील या छाव्याचा मृतदेह तब्बल 28 हजार वर्ष (28 thousand years old) जुने असल्याचं सिद्ध झालं आहे. मात्र आजही या छाव्याचा सांगाडा, त्याचे अवयव, मेंदू, कवटी, त्वचा आणि इतर अवयव जसेच्या तसे आहेत. वर्षानुवर्षं बर्फाच्छादित गुहेत एखाद्या प्राण्याचा देह इतक्या चांगल्या अवस्थेत असल्याचं हे दुर्मिळ उदाहरण असल्याचं सांगितलं जात आहे. स्वीडनमधील शास्त्रज्ञांनी या छाव्याचं नाव स्पर्टा (Sparta) असं ठेवलं आहे. हे स्त्री जातीचं सिंहाचं पिल्लू केवळ दोन महिने वयाचं असताना त्याचा जीव गेला असावा, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या छाव्याचे दात आणि त्वचाच नव्हे, तर सॉफ्ट ऑर्गनदेखील आहेत तसे असल्यामुळं आश्चर्य व्यक्त होतंय. अत्यंत उत्तमरित्या जतन केला गेलेला हा मृतदेह सिंहांच्या वंशशास्त्राच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दुसरा छावाही सापडला सायबेरियातील या गुहेत आणखी एका छाव्याचा मृतदेहही शास्त्रज्ञांना सापडला आहे. सुरुवातीला एकमेकांच्या जवळच या दोन्ही प्राण्यांचे मृतदेह आढळल्यामुळे हे दोन छावे भाऊ-बहिण असावेत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता. मात्र त्यांच्या परिक्षणानंतर तो खोटा ठरला आहे. या दोघांचे मृतदेह गुहेत जवळजवळ सापडले असले तरी त्या दोघांच्या जन्मामध्ये तब्बल 15 हजार वर्षांचं अंतर असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. दुसऱ्या छाव्याचं नाव बोरिस असं ठेवण्यात आलं असून तो स्पर्टापूर्वी 15 हजार वर्षं मेला होता, असं शास्त्रज्ञांनी जाहीर केलं आहे. स्पर्टाच्या तुलनेत बोरिसच्या मृतदेहाचं बरंच नुकसान झालं असलं तरी काळाचा विचार करता त्याचा मृतदेहदेखील चांगल्याच अवस्थेत आहे. रेडिओकार्बन डेटिंगच्या दाव्यानुसार दोघांच्या गुहेतील अंतरात केवळ 49 फुटांचं अंतर होतं, मात्र प्रत्यक्षात हजारो वर्षांच्या फरकानं त्यांचा जन्म झाला होता. हे वाचा -भारतात लवकरच आणखी एक लस, Zydus Cadila ला मिळणार मंजुरी पूर्व सायबेरियाच्या भागात 2017 आणि 2018 साली या छाव्यांचे देह सापडले आहेत. एखाद्या हिंस्त्र प्राण्याने त्यांना मारलं असावं, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. मात्र शिकार करूनही त्यांचा कुठलाच अवयव खराब झाला नसल्यामुळे शास्त्रज्ञांनाही आश्चर्य वाटत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: History, Wild animal

    पुढील बातम्या