Home /News /news /

Coronavirus: कोरोनाच्या वॅक्सिनसाठी संपूर्ण जगाला भारताकडून आशा, कारण...

Coronavirus: कोरोनाच्या वॅक्सिनसाठी संपूर्ण जगाला भारताकडून आशा, कारण...

जगातील सर्व देश या विषाणूपासून मुक्त होण्यासाठी लसी किंवा औषधं तयार करण्यात गुंतले आहेत, परंतु आतापर्यंत कोणालाही यश आलेलं नाही. अशा परिस्थितीत आता कोविड -19 लस (Covid-19 vaccine) कधी तयार होणार या आशेने सगळं जग भारताकडे पहात आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 27 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सुमारे 3 दशलक्ष लोकांना कोविड -19 (Covid-19)विषाणूची लागण झाली आहे. जगातील सर्व देश या विषाणूपासून मुक्त होण्यासाठी लसी किंवा औषधं तयार करण्यात गुंतले आहेत, परंतु आतापर्यंत कोणालाही यश आलेलं नाही. अशा परिस्थितीत आता कोविड -19 लस (Covid-19 vaccine) कधी तयार होणार या आशेने सगळं जग भारताकडे पहात आहे. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो म्हणाले की, कोरोना विषाणूपासून मुक्त होण्यासाठी भारत आणि अमेरिका एक कोरोनाव्हायरस लस विकसित करत आहेत. खरंतर, लस बनवण्यासाठी हे दोन देश एकत्रितपणे तीन दशकांपासून कार्यरत आहेत. दोन्ही देश संयुक्त लस विकास प्रोग्राम राबवत आहेत. डेंग्यू, आतड्यांचा आजार, इन्फ्लूएन्झा आणि टीबीपासून बचाव करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने एकत्र काम केलं आहे. आता नजीकच्या काळात डेंग्यू लसीच्या चाचणीवर काम सुरू आहे. भारत जगातील सर्वात मोठा जेनेरिक औषधं आणि लस उत्पादक देश आहे. आपला भारत प्रमुख लस उत्पादक देश आहे. इथं पोलिओ, मेनिंजायटीस, न्यूमोनिया, रोटाव्हायरस, बीसीजी, गोवर, गालगुंड आणि रुबेला लस किंवा औषधं पूरक बनवली जातात. आता कोविड -19 ला थांबविण्यासाठी 12हून अधिक भारतीय कंपन्या लस तयार करत आहेत. पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा, लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय होणार? बीबीसीच्या म्हणण्यानुसार, अशा कंपन्यांमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा समावेश आहे. ही जगातील सर्वात मोठी लस आणि त्याचे डोस उत्पादक कंपनी आहे. ही 53 वर्षीय जुनी कंपनी दर वर्षी 1.5 अब्ज डोसची निर्मिती करते. या कंपनीत सुमारे 7,000 लोक काम करतात. कंपनी 165 देशांमध्ये 20 लस पुरवते. आता या फर्मनं अमेरिकन बायोटेक कंपनी कोडगेनिक्सशी करार केला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर्श पूनावाला म्हणाले, आम्ही एप्रिल महिन्यात या लसीच्या उंदरावर चाचणी घेण्याच्या विचारात आहोत. सप्टेंबरपर्यंत मानवांवर चाचण्या करण्याच्या तयारीत आहोत. ”ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने करार केला आहे. BREAKING : पुण्यात एका रात्रीत वाढले कोरोनाचे 55 रुग्ण, जिल्ह्यातील आकडाही वाढला गुरुवारी ऑक्सफोर्डमध्ये त्याची मानवी चाचणी सुरू होईल. ऑक्सफर्डमधील जेनर इन्स्टिट्यूट चालवणारे प्रो. अ‍ॅड्रियन हिल म्हणाले, "जगाला वर्षाच्या अखेरीस कोट्यावधी डोसची आवश्यकता आहे." भारतीय फर्मकडे 400 ते 500 दशलक्ष डोसची अतिरिक्त क्षमता आहे. ' हैदराबाद स्थित भारत बायोटेकने विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठ आणि अमेरिकेतील फर्म फ्लुजन कंपनीशी करार केला आहे आणि लसच्या सुमारे 300 दशलक्ष डोसचं उत्पादन केलं आहे. झायडस कॅडिला दोन लसांवर काम करत आहे. बायोलॉजिकल ई, इंडियन इम्युनोलॉजिकल आणि मिन्वॅक्स कंपनीही लस विकसित करण्यात गुंतलेली आहेत. आणखी चार-पाच कंपन्या देखील लस विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. लॉकडाऊनमुळे प्रदूषणावर झाला सगळ्यात चांगला परिणाम; दिल्ली, मुंबई झाली ग्रीन झोन संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या