कोरोनाला रोखण्यासाठी लॉक डाऊन पुरेसे नाही तर..., WHOच्या वक्तव्याने खळबळ

कोरोनाला रोखण्यासाठी लॉक डाऊन पुरेसे नाही तर..., WHOच्या वक्तव्याने खळबळ

जगात कोरोना विषाणूची सुमारे 2.5 लाख प्रकरणे आली आहेत, तर जवळपास 15 हजारांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मार्च : कोरोनामुळे साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. भारतातही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच कोरोनाला रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांत लॉक डाऊन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातही आजपासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. या लॉक डाऊनमध्ये लाईफ लाईन असणारी मुंबई लोकलही बंद करण्यात आली आहे.

त्यामुळे आता कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लोकांना घरा बाहेर पडण्यास मनाई आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्व देश आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत. मात्र आता याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वेगळे मत व्यक्त केले आहे. WHOच्या मते कोरोनाला रोखण्यासाठी फक्त लॉक डाऊन पुरेसे नाही आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, WHOचे माईक रायन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कोरोना रोखण्यासाठी लॉक डाउन पुरेसे नाही, याक्षणी आजारी असणाऱ्या लोकांना शोधण्याची व त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची गरज आहे. असे केल्यास कोरोनाला रोखता येईल.

माईक रायन यांच्या मते, लॉकडाऊनची सर्वात मोठी समस्या अशी आहे की जेव्हा ते संपेल तेव्हा लोक अचानक मोठ्या संख्येने बाहेर येतील आणि हे सद्य परिस्थितीत धोकादायक आहे.

जिल्हाधिकारी आले धावून, बंदमध्ये अडकलेल्या 40 प्रवाशांना सुखरुप पोहोचवलं घरी

जगात कोरोना विषाणूची सुमारे 2.5 लाख प्रकरणे आली आहेत, तर जवळपास 15 हजारांचा मृत्यू झाला आहे. भारताबाबत बोलायचे झाल्यास सुमारे 400 कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदली गेली आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

चीन पॅटर्नची गरज

माईक रायन यांच्या मते, चीन, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया लॉक डाऊनवर गेले तेव्हा कोरोना विषाणूचा धोका असलेल्या प्रत्येक व्यक्तीची त्यांनी चौकशी केली. आता युरोप, अमेरिका, भारत आणि इतर देशांनी समान मॉडेल लागू केले पाहिजे. जर त्याचा प्रसार होण्यापासून रोखला गेला तर रोगाचा सामना केला जाऊ शकतो.

लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय?

लॉक डाऊन ही आपत्कालीन प्रणाली आहे, जी एखाद्या साथीच्या किंवा आपत्तीच्या वेळी अधिकृतपणे शहरात लागू केली जातात. कोरोनामुळे सध्या चीन, इटली, स्पेन या देशांमध्येही लॉक डाऊन करण्यात आला आहे. चीनमधील परिस्थिती लॉक डाऊननंतरच सुधारली त्यामुळे राज्यात कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासाठी नागरिकांना घरात राहणे बंधनकारक आहे. लॉक डाऊनमध्ये लोकांना घरे सोडण्याची परवानगी नसणार. तसेच, 5 पेक्षा जास्त लोकं एका ठिकाणी जमू शकणार नाही. लोकांना केवळ औषध, अन्नधान्य अशा आवश्यक गोष्टींसाठी बाहेर येण्याची परवानगी असणार आहे.

आई दवाखान्यात मात्र महाराष्ट्राचा लढवय्या लेक कोरोनाशी लढतोय, टोपेंचं कौतुक

First published: March 23, 2020, 8:49 AM IST

ताज्या बातम्या