World Cup : शमीबद्दल पाकिस्तानी क्रिकेटपटूचं वादग्रस्त वक्तव्य, पाहा VIDEO

World Cup : शमीबद्दल पाकिस्तानी क्रिकेटपटूचं वादग्रस्त वक्तव्य, पाहा VIDEO

ICC Cricket World Cup स्पर्धेत शमीने 3 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या कामगिरीवरून पाकिस्तानी क्रिकेटरनं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

  • Share this:

बर्मिंगहम, 02 जुलै : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यान वर्ल्ड कपच्या तीन सामन्यात 13 गडी बाद केले आहे. भारताकडून 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध त्याने 5 विकेट घेतल्या तरीही भारताचा पराभव झाला. या पराभवानंतर पाकिस्तानची सेमीफायनलची वाट बिकट झाली. त्यामुळे अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारत मुद्दाम हरल्याचा आरोप केला आहे.

पाकचे माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्त यांनी शमीच्या चांगल्या कामगिरीसाठी चक्क धर्माचं योगदान असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी एका टीव्ही चॅनेलवर चर्चेत हे वक्तव्य केलं आहे. बख्त म्हणाले की, भारताकडे गोलंदाजांची कुमक चांगली आहे. जगातला सर्वोत्तम गोलंदाज बुमरहा आहे. कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आहे. त्याशिवाय शमीने केलेली कामगिरी तर सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. तो मुस्लिम आहे ही चांगली गोष्ट आहे. ठीक आहे तो भारताकडून खेळत आहे असंही बख्त यांनी म्हटलं आहे.

बख्त यांनी यापूर्वीही अशी वक्तव्ये केली होती. इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी ते म्हणाले होते की, पाकला वर्ल्ड कपमधून बाहेर काढण्यासाठी भारत इंग्लडंविरुद्ध पराभूत होईल. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या फलंदाजीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

भारताने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यानं पाकिस्तानचा सेमीफायनल प्रवेश अडचणीत आला आहे. पाकिस्तानला बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. तसेच इंग्लंडने पुढचा सामना जिंकावा अशी प्रार्थना करावी लागेल. पाक आणि इंग्लंडने पुढचे सामने जिंकले तरीही पाकिस्तान सेमीफायनलला पोहचू शकणार नाही. जर भारत इंग्लंडविरुद्ध जिंकला असता तर पाकिस्तानला पोहचण्याची संधी मिळाली असती. त्यामुळं पाकिस्तानी चाहत्यांसह क्रिकेटपटूंनी भारतावर आरोप केले.

रोहित शर्मा म्हणाला, फक्त धोनीचं काम नाही तर इतरांचीसुद्धा जबाबदारी

World Cup : शंकरची दुखापत संशयाच्या भोवऱ्यात, BCCIनं दिलं कामगिरीचे फळ?

World Cup : शंकर आऊट मयंक इन! रहाणेनं निवृत्ती घेतली का?

SPECIAL REPORT : भगव्या जर्सीमुळे टीम इंडियाचा पराभव?

First published: July 2, 2019, 5:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading