वर्ल्डकपच्याआधी विराटने दिला मनोरंजनाचा तडका, डिविलियर्सला दिलं अनोखं चॅलेंज

वर्ल्डकपच्याआधी विराटने दिला मनोरंजनाचा तडका, डिविलियर्सला दिलं अनोखं चॅलेंज

एकीकडे टीम इंडिया तिसऱ्यांदा वर्ल्ड कप मायदेशात आणण्यासाठी घाम गाळत आहे तर दुसरीकडे कर्णधार विराट कोहली आपल्या डान्सने प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.

  • Share this:

लंडन, 25 मे- भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कपसाठी काही दिवसांपूर्वी इंग्लंडला रवाना झाला. आज न्युझीलंडसोबत टीम इंडिया पहिला सराव सामना खेळत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदा वर्ल्ड कप खेळण्यासाठी रवाना झाला.

एकीकडे टीम इंडिया तिसऱ्यांदा वर्ल्ड कप मायदेशात आणण्यासाठी घाम गाळत आहे तर दुसरीकडे कर्णधार विराट कोहली आपल्या डान्सने प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. विराटने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. यात तो डान्स करताना दिसत आहे. विराट या व्हिडिओमध्ये सिग्नेचर स्टेप करत चाहत्यांना  आणि खेळाडूंना डान्स चॅलेंजही देत आहे.

लक्ष्मीकांत बेर्डेच्या आठवणीत भावुक झाला सलमान खान, म्हणाला...

विराटने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आरसीबीचा खेळाडू एबी डिविलियर्स आणि भारतीय क्रिकेटर आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला त्याने डान्स चॅलेंज दिलं आहे. आता डिविलियर्स आणि श्रेयस विराटचं हे डान्स चॅलेंज स्वीकारतात की नाही हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

शाहीदची अशी अवस्था यापूर्वी कधीच पाहिली नसेल, Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

ज्युनिअर एनटीआरचं मूळ नाव वाचून तुम्हीही व्हाल हैराण, जाणून घ्या त्याच्याशी निगडीत या 5 गोष्टी

विशेष म्हणजे, टीम इंडियाचा पहिला वर्ल्ड कप सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. 25 मे रोजी न्युझीलंडशी पहिला सराव सामना तर 28 मे रोजी बांग्लादेशविरुद्ध दुसरा सराव सामना खेळतील. 16 जून रोजी भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिद्वंदी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

प्लॅस्टिक सर्जरीनंतर या अभिनेत्रींचा चेहराच बदलला, त्यांना पाहिल्यावर तुम्हीही घाबराल!

वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्र सिंह धोनी (यष्ठीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, विजय शंकर, दिनेश कार्तिक, केएल राहुल, रविंद्र जडेजा

करण जोहरच्या बेडरूममध्ये आहे या अभिनेत्याच्या बायकोचा फोटो

VIDEO: सुरतमधील भीषण आग प्रकरण, 3 जणांविरोधात गुन्हा दाखल

First published: May 25, 2019, 4:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading