वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजेत्यांना एक रुपयाही दिला जात नाही, कारण...

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजेत्यांना एक रुपयाही दिला जात नाही, कारण...

कोणत्याही खेळात राष्ट्रीय स्पर्धा असली तरी विजेत्यांवर बक्षिसांवर वर्षाव केला जातो. मात्र बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजेत्यांना फक्त पदक आणि चषक दिला जातो.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : आयपीएलसारख्या स्पर्धेत विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव होत असतो. जागतिक स्तरावर बक्षिसाची रक्कम मोठी असते. मात्र बॅडमिंटनच्या वर्ल्ड चॅम्पियनसिप स्पर्धेत विजेत्यांना कोणत्याही प्रकारची रक्कम दिली जात नाही. त्यांना फक्त एक पदक दिलं जातं. जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेतील एक असलेल्या या स्पर्धेत जवळपास 50 देशातील खेळाडू सहभागी होतात. पण त्यांना जिंकल्यावर पदक आणि चषक दिला जातो.

जगात सर्वात लोकप्रिय असलेल्या फुटबॉल, क्रिकेट, टेनिस, हॉकी या खेळामधील वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुरुवात झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी बॅडमिंटन चॅम्पियनशिप सुरू झाली. यामध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप टेनिस डेव्हिस कप स्पर्धा सुरू झाली. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप उशिरा सुरू होण्यामागे ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धा असल्याचं मानलं जातं. ही स्पर्धा म्हणजेच वर्ल्ड चॅम्पियनशिप अशी समजूत होती.

1899 मध्ये झालेली इंग्लंड ओपन ही स्पर्धा तेव्हाची सर्वात मोठी बॅडमिंटन स्पर्धा होती. मात्र ती स्पर्धा फक्त इंग्लंडमध्येच होती. दरम्यान, बॅडमिंटनला जागतिक स्तरावर पोहचवण्यासाठी धडपड सुरू झाली आणि त्यातूनच वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुरुवात झाली. 1977 मध्ये सुरू झालेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कोणत्याही विजेत्याला बक्षिस म्हणून रक्कम मिळत नसली तर त्यांना स्पर्धेत सर्वाधिक पॉईंट मिळतात.

बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या सुरुवातीच्या तीन स्पर्धा दर तीन वर्षांनी खेळवण्यात आल्या. त्यानंतर 2005 मध्ये मात्र ही स्पर्धा दर दोन वर्षांनी होऊ लागली. 2006 पासून ऑलिम्पिक वर्ष सोडून प्रत्येक वर्षी चॅम्पियनशिपमध्ये एकेरीमध्ये जास्तीजास्त चार जोड्या तर दुहेरीमध्ये 4-4 जोड्या भाग घेऊ शकतात.

VIDEO: तुझ्या गाडीची हवा इथेच काढेन, आमदार अंजली निंबाळकर यांचा रूद्रावतार

Published by: Suraj Yadav
First published: August 19, 2019, 11:40 PM IST
Tags: badminton

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading